• Tue. Aug 4th, 2026
    Ambadas Danve: रखडलेल्या योजना पूर्ण करा ; अंबादास दानवे यांची जलसंपदा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

    Ambadas Danve: पार पडलेल्या बैठकीत सिंचन प्रकल्पांची माहिती आणि अडचणी जाणून घेत रखडलेली काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अंबादास दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

    म.टा.प्रतिनिधी , छत्रपती संभाजीनगर : दरम्यान, उर्ध्व पेनगंगा, बाभळी, उनकेश्वर, पोटा, जोडपरळी, ममदापूर, पिंपळगाव कुटे, निम्न दुधना, जायकवाडी टप्पा-२ आणि वाकोद जोडकालवा यांसह विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर असून, निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    सरकारकडे निधीची मागणी करा

    मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणि विभागातील इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. सिंचन प्रकल्पांची माहिती आणि अडचणी जाणून घेत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना अंबादास दानवे यांनी केली. या योजनांसाठी सरकारकडे निधीची मागणी करा, असे दानवे यांनी सांगितले.

    सरकारने घोषणा केलेले प्रकल्प रखडले

    मराठवाडा विभागात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांचा आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी आढावा घेतला. या बैठकीला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मराठवाड्यासाठी राज्य सरकारने १६ सप्टेंबर २०२३ रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांचा दानवे यांनी आढावा घेतला. सरकारने घोषणा केलेले प्रकल्प रखडले आहेत.

    चर्चा करण्यात आली

    मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणि सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पनिहाय व जिल्हानिहाय प्रगती, निधी वितरण व खर्च, पूर्ण व सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती दानवे यांनी जाणून घेतली. सिंचन योजनांतील अडचणी व उपाययोजना, तसेच पुढील कालावधीतील नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

    Maharashtra TimesNashik News: नाशिकच्या भूकंप लहरी आता दिल्लीत जाणवणार ; भूकंपप्रवण भागात निरीक्षण यंत्रणा उभारणार

    कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना

    पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या आठव्या टप्प्यावर चर्चा झाली. ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली नसल्याने परिसरातील गावांचा सिंचनाचा प्रश्न कायम आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. जायकवाडी धरण, शिवना-टाकळी धरण, नांदूर मध्यमेश्वर कालवा, शनिदेव उच्चपातळी बंधारा यासह पूरनियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना दानवे यांनी केली.

    बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी अद्यापही आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही. काही बंधाऱ्यांची दुरुस्ती जलसंपदा विभागाच्या देखभाल-दुरुस्ती निधीतून करण्यात आली असली, तरी बहुतांश बंधारे निधीअभावी नादुरुस्त आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धोका असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

    Maharashtra TimesMumbai Police Scam: मुंबई पोलिस दलात मोठा घोटाळा; तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, प्रकरण काय?

    तातडीने निधी देण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात यावी

    या कामांसाठी तातडीने निधी देण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात यावी, असे दानवे म्हणाले. मिटमिटा परिसरात महापालिकेचा पाणीपुरवठा नसल्याने पडेगाव तलावातून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक गणेश लोखंडे यांनी केली.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा