Nashik Crime : नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असल्याचे भासवत आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : इन्स्टाग्रामवर ओळख करून पोलिस अधिकारी असल्याचे भासवत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून तीन लाख रुपये उकळल्याचा प्रकार तालुक्यात समोर आला आहे. पैसे उकळल्यानंतर ‘एआय’द्वारे बनवलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तोतयाला वावी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
काय आहे प्रकरण?
आशुतोष पाटील या नावाने ओळख सांगणाऱ्या या भामट्याचे खरे नाव आसिफ कौसर तडवी (रा. जळकी बाजार, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. त्याने इन्स्टाग्रामवरून सिन्नर तालुक्यातील एका तरुणीशी ओळख वाढवली. सुरुवातीला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस दलात कार्यरत असल्याचे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला. नंतर खात्यांतर्गत बढती मिळून आपण पीएसआय झालो असल्याचेही सांगितले.
लग्नाच्या आमिषाने पैशांची लूट
नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असल्याचे भासवत त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. या काळात त्याने विविध कारणे सांगत तरुणीकडून वारंवार पैशांची मागणी केली. तरुणीनेही त्याला वेळोवेळी पैसे पाठवले. मात्र, या प्रकरणाची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता सदर व्यक्ती बनावट नावाने फसवणूक करत असल्याचे समोर आले. Dosa Batter Death : आईच्या दुधावाटे विषबाधा पसरत नाही, मग चिमुरड्या राहाचा जीव कसा गेला? डॉक्टरांची टिप, डोसा मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं
आक्षेपार्ह फोटो तयार करुन ब्लॅकमेल
यानंतर तरुणीने वावी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताने एआय तंत्रज्ञानाच्या आधारे तरुणीचे आक्षेपार्ह फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तपासात समोर आले. पोलिसांच्या सूचनेनुसार तरुणीने संशयिताला भेटण्यासाठी बोलावले. ठरल्याप्रमाणे तो तिच्या गावी आला असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Sadabhavu Khot | एसटी महामंडळात अधिकारी गैरहजर, खोत संतापले, पुढे काय घडलं?
महागड्या स्पोर्ट बाईकवर ‘पोलीस’ लिहिलेलं
तडवी हा महागड्या स्पोर्ट बाइकवरून तरुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने मिलिटरी रंगाची पॅन्ट, पांढरा टी-शर्ट, टोपी तसेच गळ्यात ओळखपत्र अडकवून पोलिस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा आव आणला होता. त्याच्या बाइकवरही पुढील बाजूस ‘पोलिस’ असे ठळक अक्षरांत लिहिलेले होते. Kolhapur News : माझ्या बाळाची चिरफाड करु नका; अन्वीकचा दारात खेळताना मृत्यू, आरती ताईंनी पोस्टमार्टम थांबवलं, जुळी बहीण कावरीबावरी
यापूर्वीही फसवणुकीचे प्रकार
तडवी हा उच्चशिक्षित असून यापूर्वीही अशा प्रकारच्या फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस असल्याची बतावणी करून त्याने वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना अडवून लुटल्याचा प्रकार २०२२ मध्ये उघड झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तसेच अजिंठा पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा