Baramati Bypoll Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील उमेदवार मागे घेतल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाढली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवल्यानंतर, हायकमांडने माघार घेण्यास हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर पत्रकार परिषदेतून हा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. काँग्रेसने या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याचे मानले जात आहे.
भाजपवर टीका
पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी अजित पवार गटाच्या भाजपसोबतच्या युतीवर जोरदार टीका केली. “राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसारख्या विखारी पक्षासोबत राहू नये. सत्तेसाठी लाचार होऊ नये,” असे ते म्हणाले. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने अशी भूमिका घेणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Chhatrapati Sambhajinagar Crime : जातीवरुन छळ, मानसिक त्रास; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, एसटी महामंडळात खळबळ
‘रोहित पवार, सुप्रिया सुळेंनी विनंती केली’
दरम्यान, काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने संपर्क साधला जात होता, अशी माहितीही सपकाळ यांनी दिली. रोहित पवार यांनी आज सकाळीच त्यांची भेट घेऊन विनंती केली होती. तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
“भाजपच्या विरोधात वैचारिक भूमिका म्हणून आम्ही ही निवडणूक लढवत होतो. मात्र अजित पवार यांच्यासोबत काम केल्यामुळे आणि भावनिक भूमिका लक्षात घेता राष्ट्रवादीकडून मघार घेण्याची विनंती करण्यात आली,” असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती, असेही त्यांनी सांगितले.
Sindhudurg News : स्पोर्ट्स बाईक आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक; मित्रांसोबत मालवण फिरायला गेलेल्या ओंकारचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
‘सुनेत्रा पवारांनी केली होती विनंती’
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार यांनीही फोनवरून संपर्क साधत काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली होती. महायुतीतील विविध नेत्यांनीही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली होती. याशिवाय मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही दिल्लीत सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
