नागपूरच्या 17 वर्षीय दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने 29 किलोमीटरची’पाल्क सामुद्रधुनी’ पार करत इतिहास रचला आहे. दृष्टी नसताना ईश्वरीने जी कामगिरी करुन दाखवली आहे त्याबद्दल तिचं कौतुक होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिद्द, चिकाटी आणि मेहनत आपल्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जातं. नागपुरात एका 17 वर्षीय जलतरणपटू ईश्वरी पांडे हिचं यामुळेच कौतुक होत आहे. ईश्वरीची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. ईश्वरीला जन्मापासून दृष्टी नाही. पण दृष्टी नसतानाही तिने दृष्टी असणाऱ्या अनेकांचे डोळे उघडले आहेत. प्रचंड मेहनत आणि जिद्द आपल्याला किती यशस्वी करु शकतं हे तिने दाखवून दिलं आहे. अवघ्या 17 वर्षाच्या ईश्वरीने समुद्रातून 29 किलोमीटरचा प्रवास केला आहे. हा प्रवास तिने 11 तास 15 मिनिटांत पूर्ण केला आहे. दृष्टी नसताना तिने दाखवलेल्या या कर्तृत्वाचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
नागपूरच्या १७ वर्षीय दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी कमलेश पांडे हिने जिद्द आणि धैर्याच्या जोरावर ‘पाल्क सामुद्रधुनी’ पार करत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करणारी ती जगातील पहिली पूर्णपणे दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरीने ६ एप्रिल २०२६ रोजी श्रीलंकेतील तलाईमन्नारजवळील उरमालाई पॉईंट येथून पहाटे ४ वाजता जलतरणास सुरुवात केली. तब्बल ११ तास १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी ३:१५ वाजता ती धनुष्कोडी येथील अरिचलमुनई येथे पोहोचली. या दरम्यान तिने सुमार २९ किलोमीटरचा समुद्री प्रवास पूर्ण केला.
ईश्वरीने कसा केला समुद्रातून प्रवास?
समुद्रातील जोरदार प्रवाह, बदलत्या लाटा आणि जेलीफिशचा धोका अशा प्रतिकूल परिस्थितीतही ईश्वरीने अपूर्व सहनशक्ती आणि मानसिक कणखरता दाखवली. जन्मतःच दृष्टिहीन असतानाही तिने सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटीच्या जोरावर खुल्या पाण्यातील जलतरणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या जलतरण मोहिमेचे आयोजन थेनी येथील ‘ओपन वॉटर स्विमिंग ॲकॅडमी’तर्फे करण्यात आले होते. मोहिमेदरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि तामिळनाडू राज्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पराक्रमाची नोंद करण्यात आली.
या ऐतिहासिक प्रयत्नाचे निरीक्षण पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे एम. विजयकुमार, तमिळनाडू ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचे जयकुमार तसेच सुखदेव धुर्वे यांनी केले. हा उपक्रम नागपूर येथील शार्क अॅक्वाटिक स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संजय बाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पराक्रम घेण्यात झाला. तसेच भावी राजगिरे, ईशांत पांडे, संदीप वैद्य, निरव पांडिया यांनी सहकार्य केले, तर डॉ. अभय राजगिरे यांनी वैद्यकीय देखरेख सांभाळली. या विक्रमासाठी समाजातून निधी गोळा करण्यात आला. जन्मतः दृष्टिहीन असतानाही ईश्वरीने सातत्याने खुल्या पाण्यातील आव्हानांवर मात करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. तिचे वडील कमलेश आणि आई अरुणा सदैव पाठीशी उभे होते, अशी भावना ईश्वरीने व्यक्त केली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा