• Sun. Jun 14th, 2026
    Nandurbar Akshay Gangarde : हातात ‘मन में है विश्वास’ पुस्तक, महसूल खात्याच्या सचिवांची एन्ट्री; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अक्षयचं थेट विश्वास पाटील नांगरेंशी बोलणं

    Nandurbar Waghale Akshay Gangarde : नंदुरबारच्या वाघाळे गावातील एका अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अक्षय गांगर्डे या युवकासाठी आजचा दिवस आयुष्यभराची शिदोरी ठरला आहे.

    अक्षय गांगर्डे आणि विश्वास नांगरे पाटील संभाषण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नंदुरबार, महेश पाटील : नंदुरबारमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार नंदुरबार जिल्ह्यातील वाघाळे गावातील येथील अभ्यासिका ठरली. हातात आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचं ‘मन में है विश्वास’ हे पुस्तक घेऊन अभ्यासात मग्न असलेल्या अक्षय गांगर्डे या तरुणाला राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी थेट त्याच्या प्रेरणास्थानाशी म्हणजेच विश्वास नांगरे पाटलांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली.

    विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्क

    जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या अभ्यासिकेला भेट देताना विकास खारगे यांनी अक्षयच्या हातातील पुस्तक पाहिलं. संवादादरम्यान अक्षयने विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी कधीही बोललो नसल्याचं सांगितलं. त्यानंतर खारगे यांनी तत्काळ मोबाईलवरून विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्क साधत अक्षयचा थेट संवाद घडवून आणला. या संवादादरम्यान विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘माझेही रोल मॉडेल विकास खारगे सर आहेत,’ असं सांगताच उपस्थित तरुणांना प्रेरणेचा नवा धडा मिळाला. आपल्या आदर्श व्यक्तीचे आदर्शश स्वतः समोर उभे असल्याचं पाहून अक्षय पुरता भारावून गेला.
    Maharashtra TimesGoregaon Creek Bridge: गोरेगाव खाडीवर सहा पदरी पूल, केबल-स्टेड ब्रिजमुळे वाहतूक कोंडी फुटणार; कुठून-कुठे जोडणार?
    याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रांताधिकारी उषाराणी देवगुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाघाळेच्या अभ्यासिकेत घडलेला हा प्रसंग केवळ एका फोन कॉलचा नव्हता; तर तो एका विद्यार्थ्याच्या स्वप्नांवर ठेवलेल्या विश्वासाचा आणि त्याला मिळालेल्या योग्य मार्गदर्शनाचा प्रेरणादायी क्षण ठरला.
    Maharashtra TimesNashik News : महा ई-सेवा केंद्र चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले, प्रशासनाचा कारवाईचा बडगा, 1300 वर परवाने रद्द; कारण काय?

    महाराष्ट्र महसूल विभागाकडून ट्वीट

    दरम्यान, हे सर्व राज्याच्या महसूल विभागाकडून देखील ट्वीट करण्यात आलं आहे. त्यांनी त्यात म्हटलं आहे की, ‘मन मे है विश्वास’ आणि साथ मे है ‘विकास’! महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी नंदुरबारच्या वाघाळे येथील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अक्षय गांगर्डेचा IPS विश्वास नांगरे पाटील यांच्याशी थेट संवाद घडवून आणला. एका फोन कॉलने अनेक स्वप्नांना नवी उभारी दिली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा