• Wed. Jun 17th, 2026
    Latur News : ‘मी आता जगणार नाही, माझी वाट पाहू नका’; लातूरच्या तरुण इंजिनीअरने लंडनमध्ये आयुष्य संपवलं, बायकोमुळे तणावात

    Latur Engineer Hanmant Patil End his Life in London : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बोडका येथील मूळ रहिवासी, लंडनमध्ये आयटी अभियंता म्हणून कार्यरत असलेले हणमंत अण्णाराव पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    अभियंता हणमंत पाटील लंडन आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर : उच्च शिक्षणाच्या जोरावर परदेशात चांगली नोकरी, महिन्याला लाखो रुपयांचा पगार, डोळ्यात सुखी आयुष्य जगण्याची स्वप्न. सुखी संसार सुरु असताना आणि सगळेच सुरळीत असताना एका तरुणाने लंडनमध्ये टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दरम्यान, घरापासून कैक मैल लांब असलेल्या या तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबत केलेल्या फोनवरील संवाद ऐकून कुटुंबाच्याही काळजाचा ठोका चुकलाय. तर गावात देखील या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

    नेमकं कारण काय?

    घटनेतील मृत हणमंत अण्णाराव पाटील हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बोडका येथील रहिवासी होते. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते लंडन येथे आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, त्यांना अपत्य नव्हते. अशातच गेल्या वर्षभरापासून पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत होती. तर कधी वैयक्तिक मतभेद आणि शाब्दिक चकमक होत होती. यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त होऊन वेगळी राहत होती.
    Maharashtra TimesNandurbar Akshay Gangarde : हातात ‘मन में है विश्वास’ पुस्तक, महसूल खात्याच्या सचिवांची एन्ट्री; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अक्षयचं थेट विश्वास पाटील नांगरेंशी बोलणं
    दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीने हणमंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर तब्बल 2 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. या कायदेशीर दावा आणि सततच्या कौटुंबिक वादामुळे हणमंत हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. परिणामी त्यांनी याच नैराश्यातून टोकाचा निर्णय घेतला आणि लंडन येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
    Maharashtra TimesKalyan Junction: ट्रेनला 5 तास विलंब, तिकीट असूनही प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड केला वसूल; कल्याण रेल्वे स्थानकावर काय घडलं?

    ‘मी आता जगणार नाही…’

    मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी हनमंत पाटील यांनी आपल्या नातेवाइकांशी फोनवरून अखेरचा संवाद साधला होता. फोनवर बोलताना त्यांचे शब्द ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र हजार किलोमीटरवर आपल्या लेकाला वाचवण्यासाठी तथा समजावण्यासाठी कुठलाही पर्याय त्यांच्याकडे उरला नाही. यावेळी हणमंत पाटील म्हणाले, ‘मी आता जगणार नाही. माझी वाट पाहू नका. मी आत्महत्या करतोय, सर्वांची काळजी घ्या,’ असा शेवटचा निरोप त्यांनी दिला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा