• Mon. Sep 7th, 2026

Thane News : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढली नगरसेवकांची ‘विकेट’, ‘प्रेसिडेंट कप’च्या सामन्यात अधिकारी टीम विजयी

Thane News : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढली नगरसेवकांची ‘विकेट’, ‘प्रेसिडेंट कप’च्या सामन्यात अधिकारी टीम विजयी

फायलींचा ढिगारा…प्रकल्पांची डेडलाईन… सर्वसामान्यांसह वरिष्ठांच्या प्रश्नांची सरबत्ती काही तासांसाठी बाजूला ठेवत शनिवारी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उत्तम सांघिक कामगिरी करत ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची ‘विकेट’ काढली. निमित्त होते, ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे. या विशेष सामन्यात, ठाणे पालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या ‘टीम टीएमसी’ने ‘टीम कॉपरेटर्स’ अर्थात नगरसेवकांच्या संघाचा 15 धावांनी धुव्वा उडवला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एकत्र आणत ‘ प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया २०२६ ‘ ही क्रिकेट स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर खेळवली जात आहे. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित या स्पर्धेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून ते संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. स्पर्धेमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या संघाचा सामना पार पडला. तसेच ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संघाचे कर्णधार म्हणून सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी कुशल नेतृत्व करताना संघाला १५ धावांनी विजयी करत चषकावर नाव कोरले. बोरसे यांच्या १४ चेंडूतील २९, सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांच्या ११ चेंडूतील २६ धावांच्या बळावर या संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ८५ अशी मजल मारली.

अधिकारी संघाच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे नगरसेवकांचा संघ फेल

नगरसेवकांच्या संघाने या धावांचा पाठलाग करताना निर्धारित सहा षटकांमध्ये ७० धावा केल्या. नगरसेवक आदेश भगत यांनी २३ चेंडूत ५७ धावा करत एकतर्फी झुंज दिली. मात्र इतर नगरसेवक खेळाडूंची त्यांना विशेष साथ न लाभल्याने त्यांचा संघ पराभूत झाला. नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर आणि आदेश भगत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सचिन बोरसे ‘सामनावीर’

ठाणे पालिकेच्या अधिकारी – कर्मचार्‍यांच्या ‘टीम टीएमसी’ संघाचे कर्णधार सचिन बोरसे यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विजेत्या संघाचा ठाणे पालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त मीनल पालांडे, फेडरेशनचे मुंबई- ठाणे-कोकण अध्यक्ष अभिजित दरेकर यांनी सन्मान केला.
Maharashtra TimesBaramati By-Election : काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर, उमेदवारी मिळवणारे कोण आहेत आकाश मोरे?

टीम संजय जाधव विजयी

कलाकारांच्या अटीतटीच्या सामन्यात अवघ्या एका धावेने टीम संजय जाधवने टीम सौरभ गोखले यांचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना जाधव यांच्या टीमने ५७ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना गोखले यांच्या संघाला ५६ धावांपर्यंत मजल मारता आली. विजय संघाला निर्माते मंगेश देसाई आणि युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी सन्मानित केले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा