• Sun. Jun 14th, 2026

    Solapur News: शाळा सुटली, मित्रांसोबत समर्थ नदीवर पोहायला गेला; पाचवीतील चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

    Solapur News: शाळा सुटली, मित्रांसोबत समर्थ नदीवर पोहायला गेला; पाचवीतील चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

    Solapur Student Death: काठावर असलेल्या त्यांच्या सोबतच्या मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली.

    शेळ्यांना पाणी पाजायला गेलेल्या पाचवीतील चिमुरड्याचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी परिसरात एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका पाचवीतील विद्यार्थ्याचा सीना नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. समर्थ कोळी (वय अंदाजे 11 वर्षे रा,होनमुर्गी,ता. दक्षिण सोलापूर,जि सोलापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याच्या इतर दोन मित्रांना सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे. नदीच्या वेगवान प्रवाहात समर्थचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला

    शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर समर्थ आणि त्याचे तीन मित्र-मैत्रिणी आपल्या शेळ्या घेऊन रानात गेले होते. दुपारच्या कडक उन्हामुळे तहानलेल्या शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी हे सर्वजण सीना नदीच्या पात्राजवळ पोहोचले. सिना नदी दुथडी भरून वाहत असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. शेळ्यांना पाणी पाजत असताना, उन्हाच्या तडाख्यामुळे या चिमुरड्यांना नदीत पोहण्याचा मोह झाला. तिघेही मित्र नदीच्या पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने तिघेही वाहून जाऊ लागले.

    एकाचा अंत, दोघांना जीवदान

    स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी घेतली आणि वाहून जाणाऱ्या दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, समर्थ पाण्याचा वेग जास्त असल्याने खोलवर ओढला गेला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. होनमुर्गी गावातील एका उमद्या शाळकरी मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पालकांनी पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांपासून मुलांना लांब ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा