• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai Local: गर्दीच्या वेळी लोकलमध्ये गर्भवती महिलांचे हाल, स्वतंत्र राखीव डब्याची मागणी; महापालिका प्रस्ताव मांडणार

    Mumbai Local: गर्दीच्या वेळी लोकलमध्ये गर्भवती महिलांचे हाल, स्वतंत्र राखीव डब्याची मागणी; महापालिका प्रस्ताव मांडणार

    Pregnant Women Compartment: लोकलमध्ये प्रवास करताना गर्भवती महिलांना दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागतो. या डब्यांमध्ये दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या अधिक असल्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मागील काही वर्षांत लोकल प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रवास जीवघेणा होत आहे. त्यातच गर्भवती महिलांना प्रवास करणेही कठीण झाले आहे. लोकलमध्ये विविध श्रेणींसाठी डबे राखीव असून गर्भवती महिलांसाठीही एक स्वतंत्र डबा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे. मुंबई महापालिकेतही स्थायी समिती अध्यक्षांनी गर्भवती महिलांसाठी राखीव डब्याच्या ठरावाची सूचना मांडली आहे. येत्या ९ एप्रिल रोजी महापालिका सभेत ही सूचना मांडली जाणार आहे.

    दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास

    मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये नोकरी, व्यवसाय इत्यादींनिमित्त प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलांची संख्यादेखील लक्षणीय असते. अशा महिलांची शारीरिक स्थिती अतिशय नाजूक असते. गर्दीच्या वेळी रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणे गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळासाठी धोक्याचे ठरू शकते. सध्या गर्भवतींसाठी रेल्वेगाड्यांमध्ये स्वतंत्र डब्याची व्यवस्था नसल्याने त्यांना दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागतो.Maharashtra TimesMumbai Local: रविवारी सकाळी मुंबईकरांचा खोळंबा! एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; प्रवासी स्थानकांवर ताटकळत

    गर्दीच्या वेळी दिव्यांगांच्या डब्यांमध्ये गर्दी असल्यामुळे गर्भवतींना बसण्यासाठी जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत पूर्ण वेळ उभ्याने प्रवास केल्याने त्यांना त्रास होतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता गर्भवती महिलांसाठी एक स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी ठरावाची सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडून मांडली जाणार आहे. राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे याचे निवेदन सादर करण्याची विनंती त्यांच्याकडून महापौरांना केली जाणार आहे.

    ‘महाराष्ट्राबाबत रेल्वेचा दुजाभाव’

    राज्यातील विशेषत: कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वेफेऱ्या आणि अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने १ मे रोजी मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

    Maharashtra TimesBullet Train: बुलेट ट्रेनच्या बोगद्याचं 5 किमी खोदकाम पूर्ण, घणसोली-शिळफाटा मार्ग तयार; मुंबईत भूमिगत स्थानक पूर्णत्वाकडे

    कोकण रेल्वेवर कमी विशेष गाड्या चालवणे, उत्तर भारताला प्राधान्य देणे अशा निर्णयांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत करी रोड येथील भिरवंडेकर सावंत मराठा समाज कार्यालयात नुकतीच कार्यकारिणी सभा पार पडली. या मुद्द्यावरून महाराष्ट्र दिनी मोर्चा काढण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा