Nashik News: प्रकरणाच्या वाढत्या गांभीर्यामुळे परिसरात संतापाची लाट असून, भोंदू खरातवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.
अशोक खरातसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने मानसिक धक्का(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणातील पीडित महिलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. खरात याच्या जाळ्यात असलेल्या महिलांना या धक्यातून सावरणे कठीण जात असून,मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत सुमारे ८ ते ९ महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे रीतसर उपचार सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांशी संबंधित काही व्हिडिओ आणि माहिती व्हायरल होत आहे. यामुळे पीडित महिलांमध्ये स्वतःची ओळख उघड होण्याची प्रचंड भीती निर्माण झाली असून चिंतेत भर पडली आहे. समाजात वावरताना होणारा त्रास आणि बदनामीच्या धास्तीमुळे अनेक पीडित महिलांना तीव्र नैराश्याचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावरील या विकृत प्रसारामुळे पीडितांच्या जखमेवर आणखी मीठ चोळल्याची भावना निर्माण होत आहे.
अशा परिस्थितीत कुटुंबाने आणि समाजाने पीडितांना आधार देणे गरजेचे आहे. तपास यंत्रणांनी देखील पीडितांची गोपनीयता राखण्यासाठी कठोर पावले उचलली असून खबरदारी घेतली जात आहे.
खरातचा मुलगा नॉट रिचेबल
अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. अशातच आता काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आणि काही तासात सोडून दिलेल्या भोंदू अशोक खरात याचा मुलगा देखील आता नॉट रिचेबल झाला आहे.
अशोक खरातविरोधातील तक्रारी पाहता सर्व बाजूने या प्रकरणाची SIT कडून चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी SIT पथकाकडून खरात याच्या कर्मयोगी नगर येथील बंगल्यातून सिनेस्टाईल भिंतीवरून उडया घेऊन खरात याच्या “तृप्तबाला” बंगल्यात शिरून त्याचा मुलगा हर्षवर्धन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र आता हर्षवर्धन हा देखील नॉट रिचेबल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. SIT कडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हर्षवर्धन खरात हा नाशिक शहरातून फरार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन खरात याचा मोबाईल बंद असल्याने अधिकारी हे खरात याचे निवासस्थान असलेल्या तृप्तबाला या बंगल्यात पोहोचले होते. मात्र हर्षवर्धन हा तेथे आढळून आला नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन याचा देखील आता पोलिसांकडून शोध सुरू केला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा