Elphinstone Bridge Demolition: वरळी ते शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवी येथे डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम सुरू होतं. शनिवारी रात्रभर हा पूल पाडण्यात आला पण सकाळपर्यंत लोकल सेवा पूर्ववत न झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: शनिवारी रात्री मध्य रेल्वेच्या मार्गावरील जुन्या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम सुरू करण्यात आलं होतं. त्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला होता. सकाळी या पुलाचं पाडकाम पूर्ण झालं असलं तरी ब्लॉक संपल्यानंतरही मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं असून रविवारी सकाळी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊन प्रवासी ताटकळत उभे होते.
पुलाचं पाडकाम सकाळी 7पर्यंत पूर्ण
मध्य रेल्वेवर परळ आणि पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी यांना हा जुना पूल जोडतो. त्यामुळे हा पूल पाडताना ब्लॉक जाहीर केला होता. या ब्लॉकदरम्यान, दादर-सीएसएमटी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यासह कुर्ला, ठाणे आणि दादरपर्यंत धावणाऱ्या गाड्यांवरही परिणाम झाला. पहाटे या पुलाचं पाडकाम पूर्ण झाल्यानंतर सकाळी 7.06 ला अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील ब्लॉक काढण्यात आला आणि 7.14 जलद मार्गावरील ब्लॉक काढण्यात आला. पण त्यानंतर गाड्यांचं वेळापत्रक सुधारायला वेळ लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक एक्सप्रेस रद्द झाल्या असून काही अर्धवट मार्गावरच चालवण्यात येत आहेत.Panchvati Express: ट्रेनचा डबा मागेच राहिला! एक डबा वगळून पंचवटी एक्स्प्रेस रवाना; सीएसएमटी स्थानकावर तांत्रिक बिघाड
सकाळी 7 दरम्यान, परिस्थिती पूर्ववत झाल्याची माहिती जरी प्रशासनाने दिली असली तरी सकाळी 8.30-9पर्यंत लोकल सेवा विस्कळीतच असल्याचे चित्र दिसत होते. रविवारच्या नियमित मेगा ब्लॉकमुळे आधीच सेवा नेहमीपेक्षा कमी असते. त्यात या ब्लॉकमुळे नियमित लोकलसुद्धा विलंबाने धावत आहेत. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे.
प्रवाशांची मोठी गैरसोय
मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांवर सकाळी गर्दी पाहायला मिळाली. तसेच, स्थानकांवर प्रवासी ट्रेनसाठी ताटकळत उभे आहेत. दरम्यान, या ब्लॉकमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी कोणार्क एक्सप्रेस माटुंगा आणि भायखळादरम्यान वळवण्यात आली. त्याशिवाय हावडा-सीएसएमटी मेस आणि मंगळुरू-सीएसएमटी एक्सप्रेससुद्धा या स्थानकांदरम्यान वळवण्यात आली. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेसेवांवरही या ब्लॉकचा परिणाम झालेला दिसून आला.
Jogeshwari Terminus: जोगेश्वरी टर्मिनससाठी आणखी एक वर्ष, 4 प्लॅटफॉर्मसह मिळणार मेट्रो, रेल्वेची जोडणी; मुंबईकरांना चौथ्या टर्मिनसची प्रतीक्षा
सध्या, रेल्वे प्रशासनाकडून लोकल सेवा पूर्ववत करण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, शनिवारी रात्री घेतलेल्या ब्लॉकदरम्यान शेवटची लोकल रात्री 10.30 च्या सुमारास सोडण्यात आली होती. सकाळी 6 पर्यंत धीम्या व जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केल्यामुळे प्रवाशांनी मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये गर्दी केली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा