रोहा तालुक्यातील कामथ येथील आनंद सानप आणि त्यांचे सहकारी किशोर सावरकर, सौरभ घरट, दत्तात्रय सावंत, कृष्णाराम जाधव, केतन फुलपगारे यांनी सुरू केलेली ‘ दुर्ग शोध मोहीम ’ सुरुवातीला केवळ अभ्यासापुरती होती. जनीचा डोंगर, पहूर गाव, वाळंजवाडी आणि परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये फिरताना त्यांनी स्थानिक वयोवृद्धांशी संवाद साधला. पहूर परिसरात सापडलेल्या सतीशिळा आणि वीरगळ, वाळंजवाडी येथील प्राचीन सुमारे ५०० वर्षांपूर्वी या डोंगर परिसरात लोक शिकारीसाठी येत असत आणि पाण्यासाठी डोंगरावरील हौदांचा वापर करत असत, अशा कथा स्थानिकांकडून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे अभ्यासकांनी त्या हौदांचा शोध घेण्याचा निर्धार केला आणि इथूनच खरी ‘दुर्ग शोध मोहीम’ सुरू झाली.
Nagpur Crime : 14 वर्षांचा अथर्व हनुमान जयंतीच्या उत्सवात हरवला, नंतर मृतावस्थेत आढळला, डोकं चक्रावणारं प्रकरण
२५ फेब्रुवारी २०२४ हा दिवस या मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरला. याच दिवशी गोमाशी डोंगरावर पहिला पाण्याचा हौद (टाकं) सापडला. या शोधानंतर संपूर्ण परिसराचा अधिक बारकाईने अभ्यास करण्यात आला आणि हा साधा डोंगर नसून, एक प्राचीन किल्ला ‘दुर्ग गोमाशीगड’ असू शकतो, हे स्पष्ट होऊ लागले. प्राथमिक निरीक्षणानुसार, हा किल्ला प्राचीन व्यापारी मार्गावर टेहळणी ठाणे म्हणून; तसेच संरक्षित वसाहतीसाठी वापरला गेला असावा. सतीशिळा आणि वीरगळ यांच्या उपस्थितीमुळे येथे कधी काळी युद्धजन्य घटना घडल्या असाव्यात, असा तर्क मांडला जातो. कालखंड निश्चित सांगता येत नसला, तरी इसवी सन ९०० नंतरच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, तर दावा पडताळणीसाठी अधिक अभ्यासाची व पुराव्यांची आवश्यकता आहे असे पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे यांनी सांगितले.
इतिहास अभ्यासक सुखद राणे यांनी स्थळाला दिलेल्या भेटीनंतर ‘हे निश्चितच किल्ल्याचे अवशेष आहेत,’ असे स्पष्ट मत नोंदवले. रायगडाकडे जाणारे कोलाड–रोहा–निजामपूर हे मार्ग लष्करी आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील होते. या मार्गांवर नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींचा वेध घेण्यासाठी लहान-मोठ्या किल्ल्यांची साखळी उभारण्यात आली होती. यांसारखे किल्ले याच धोरणाचा भाग होते. त्यामुळे ‘दुर्ग गोमाशीगड’ हादेखील अशाच टेहळणी व्यवस्थेतील एक दुवा असू शकतो, असा तर्क अधिक बळकट होतो.
Nandurbar News : आश्रमशाळेत राहणारा चिमुकला होता बेपत्ता, सेफ्टी टँकमध्ये आढळली बॉडी; आई-वडिलांचा आक्रोश, घातपाताचा संशय
वैशिष्ट्ये
-२११ मीटरः समुद्रसपाटीपासूनची उंची
-७ : गडावर पाण्याचे टाकं
-आतापर्यंत मातीच्या भांड्यांची खापर मिळाली आहेत
-एक गुहासदृश पाण्याचे टाकं
सद्यःस्थिती काय ?
-‘गोमाशीगड’ पूर्णतः उद्ध्वस्त अवस्थेत आहे.
-कोणतीही ठोस बांधकामे शिल्लक नसली तरी पाण्याच्या टाक्या, शिल्पे आणि भूगोल यावरून त्याचे किल्ला असण्याचे संकेत दिसून येतात.
-उत्खनन केल्यास इतिहासाचे पुरावे समोर येऊ शकतात.
-या ठिकाणी पोहोचणे सोपे असून सर्वसामान्य पर्यटकांसाठीही हा परिसर आकर्षण ठरू शकतो.
Dindori Accident : …तर दिंडोरी अपघाताची घटना घडली नसती, निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, स्थानिकांचा नेमका आरोप काय?
पुरातत्त्व खात्याकडून दखल घेतली जाण्याची शक्यता
सध्या या किल्ल्याबाबत कोणतेही अधिकृत शासकीय दस्तऐवज उपलब्ध नसले, तरी संशोधन पत्र तयार करून इतिहास संशोधन मंडळाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील काळात पुरातत्व खात्याकडून या शोधाची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कदाचित हा डोंगर खरोखरच इतिहासातील हरवलेला किल्ला असेल किंवा अजून काही अनोख्या रहस्यांची दारे उघडणारा ठरू शकेल. –आनंद सानप, शोध मोहिमेचे सदस्य
किल्ला म्हणून जाहीर करण्यासाठी तटबंदी किंवा बुरूज, प्रवेशद्वाराचे अवशेष, पाण्याच्या टाक्या, ऐतिहासिक कागदपत्रांत त्याचा उल्लेख किल्ला म्हणून असणे गरजेचे आहे. डोंगरावर पाण्याच्या टाक्या या सातवाहनकालीन बांधकामातही मिळतात. मात्र, युद्ध झाले ते ठिकाण किल्ला असतोच असे नाही. यामुळे या डोंगरावर पुरातत्त्वीय उत्खनन होणे फार महत्वाचे आहे.- प्रवीण कदम, कार्यकारिणी सदस्य, कोकण इतिहास परिषद.