Uran Flyover: जेएनपीए बंदराला खाजगी बंदराशी जोडणाऱ्या पुलाजवळील जोडरस्ता अचानक खचला. या मार्गावरून खाजगी बंदरावर अवजड कंटेनरची वाहतूक होते. यामुळे मार्गावरील तणाव वाढत असल्यामुळे मार्ग खचल्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, उरण: उरण तालुक्यातील जेएनपीएच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील जोडरस्त्याचा काही भाग अचानक खचला. सुमारे 68 कोटी रुपये खर्च करूण हा प्रकल्प तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करळ परिसरात राष्ट्रीय महामार्ग ४बी आणि राज्य मार्ग ५४ यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
8-10 महिन्यांत मार्ग खचला
सदर उड्डाणपूल जसखार गावाला वळसा घालत थेट चौथ्या बंदराशी जोडण्यासाठी उभारण्यात आला होता. भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या खाजगी बंदराला हा मार्ग जोडतो. मात्र, पूल सुरू होऊन अवघ्या 8-10 महिन्यातच त्याला जोडणारा रस्ता खचल्याने “पूल ठीक, पण रस्ता खचला” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत तसेच संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.Thane-Borivali Twin Tunnels: देशातील सर्वात लांब शहरी बोगदा मुंबईत! ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यांमुळे वेळ वाचणार; 11 किमी लांब मार्ग कसा असेल?
या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, काही दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. मात्र, या घटनेमुळे बंदराशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी यापूर्वीच केला होता. त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या प्रकल्पावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईत नव्या उड्डाणपुलाचं लोकार्पण, पामबीच रोड ते सायन-पनवेल महामार्ग रस्ता; पुण्याला जाणं होणार सोपं
प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांवरच रत्नेश्वरी देवीचा जत्रोत्सव येत असून, मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. अशा वेळी मार्ग खचल्याची घटना अधिकच गंभीर मानली जात आहे. मनसेचे पदाधिकारी मंगेश वाजेकर यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची झोप उडाली असून, स्थानिक नागरिकांकडूनही या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दर्जेदार काम आणि कडक देखरेख आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा