Maharashtra Unseasonal Rain Loss: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही प्रचंड हाल झाले आहेत.
या अवकाळी पावसामुळे १४ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हे नुकसान झाले आहे. यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रे आणि द्राक्षांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Anjali Damania: रुपाली चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स; अंजली दमानियांचा दावा, बड्या मंत्र्यांची घेतली नावं!
महाजन यांच्याकडून पाहणी
सिन्नर : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी सिन्नर तालुक्यातील बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री महाजन यांनी चिंचोली तसेच वडगाव पिंगळा या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. चिंचोली येथे शेतकरी रमेश नागरे यांच्या कांदा पिकाची तसेच आनंदीबाई काशिनाथ कांगणे यांच्या बीट व कांदा पिकाची त्यांनी पाहणी केली.
शिंदे गटाची डिनर डिप्लोमसी, ठाकरेंचे खासदार गळाला? संजय राऊतांचं परखड मत
जिल्हावार नुकसान (१४ मार्च ते ३१ मार्च)
नाशिक : ३०,४४८ हेक्टर
अहिल्यानगर : २३,६३३ हेक्टर
जळगाव : २२,३६१ हेक्टर
धुळे : १४,८३२ हेक्टर
बुलढाणा : ८,५०७ हेक्टर
छत्रपती संभाजी नगर : ८,४४५ हेक्टर
सोलापूर : २,४३९ हेक्टर
पुणे : १,७८५ हेक्टर
जालना : १,६९२ हेक्टर
धाराशीव : १,४०७ हेक्टर
अकोला : ९३१ हेक्टर
अमरावती : ६९६ हेक्टर
नांदेड : ५०२ हेक्टर
२९ जिल्ह्यांमध्ये एकूण नुकसान: १,२२,९९७ हेक्टर
