• Tue. Jun 9th, 2026
    मृत्यूनंतर शरीराचा उपयोग भावी डॉक्टरांना व्हावा; 91 वर्षीय आजींच्या इच्छेनुसार देहदान, तेराव्याचा खर्च वृद्धाश्रमाला

    Kalyan Woman Body Donation : ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला, तर त्यापेक्षा मोठे पुण्य नसेल,’ असा ठाम विश्वास ९१ वर्षीय वच्छला लिखार यांना होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : वयाच्या ९१व्या वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगलेल्या वच्छला लिखार यांनी मृत्यूनंतर देहदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. औपचारिक शिक्षण नसतानाही आयुष्याच्या अनुभवातून त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि कुटुंबीयांनी त्यांचा सन्मानपूर्वक स्वीकार केल्यामुळे या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    भाचीमुळे देहदानाचा निर्णय

    ग्रामीण भागात आयुष्य व्यतीत केलेल्या वच्छला लिखार यांना त्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भाचीमार्फत देहदानाचे महत्त्व समजले. त्यानंतर त्यांनी देहदानाचा ठाम निर्णय घेतला. ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला, तर त्यापेक्षा मोठे पुण्य नाही,’ असा त्यांचा विश्वास होता. याच विचारातून त्यांनी पाच वर्षांपूर्वीच कुटुंबीयांच्या मदतीने देहदानासाठी अर्ज भरून ठेवला होता.
    Maharashtra TimesCrime News : मला HIV झालाय, अत्याचारापासून वाचण्यासाठी 32 वर्षीय सरकारी कर्मचारी महिलेची थाप, तरी आरोपी थांबेना, घरात घुसून बळजबरी

    दुपारी जेवताना अखेरचा श्वास

    २८ मार्च, २०२६ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आयुष्यभर औषधांपासून दूर राहून त्यांनी निरोगी जीवन जगले. नेहमीप्रमाणे दैनंदिन दिनक्रम पूर्ण करून दुपारी जेवताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विलास लिखार यांनी दिली.

    बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी, सुनेत्रा पवारांचा ठाकरेंना फोन, राऊतांनी सगळं सांगितलं

    नातेवाईकांकडूनही अभिमान व्यक्त

    आईच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव नागपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. अंत्यविधीबाबत विचारणा करणाऱ्या नातेवाईकांनाही त्यांच्या देहदानाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अभिमान व्यक्त केला. औपचारिक शिक्षण नसतानाही समाजाला दिशा देणारा इतका विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या वच्छला लिखार प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला आहे, मात्र त्यांच्या विचारांचा वारसा कायम जिवंत राहणार आहे.
    Maharashtra TimesCrime News : मला माफ कर, मी लग्न केलेलं; नवऱ्यापाठून जीव देण्यापूर्वी लेकीचा मेसेज, अर्धशिक्षित आईला अर्थ समजलाच नाही, वेळ निघून गेली

    तेराव्याचा खर्च वृद्धाश्रमाला

    देहदानानंतर पारंपरिक विधी करता येत नसले तरी, रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या केस आणि नखांच्या सहाय्याने त्यांच्या मुलाने पवनी येथील ‘विदर्भ काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीकाठी प्रतीकात्मक विधी पार पाडले. तसेच, मृत्यूनंतर केला जाणारा तेराव्याचा खर्च वृद्धाश्रमाला दान करावा, ही वच्छला लिखार यांची इच्छा देखील कुटुंबीय पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा