• Mon. Jun 15th, 2026
    Solapur Car Accident: सोलापुरात भीषण अपघात! पुलावरुन कार थेट कालव्यात कोसळली; मुलीसह आई-वडिलांचा बुडून मृत्यू, जावई थोडक्यात बचावला

    Solapur Car Accident: नीरा उजवा कालव्यात कार कोसळून भीषण अपघात. विवाहित मुलीसह आई-वडिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात नीरा उजवा कालव्यात शुक्रवारी पहाटे कार कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, चालक थोडक्यात बचावला.

    मुंबईहून फोंडशिरसकडे जाणारी कार शुक्रवारी पहाटे सुमारे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावरील पुलावरून जात होती. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नीरा उजवा कालव्यात कोसळली. अपघात भीषण होता. त्यानंतर कारमधील प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत.

    पोलिस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात प्रीती टिळेकर (३०), मंजुळा जठार (५०) आणि हनुमंत जठार (५५) यांचा मृत्यू झाला. मंजुळा आणि हनुमंत जठार हे मोगराळे (ता. माण) येथील रहिवासी असून, ते सध्या मुंबई येथे वास्तव्यास होते. प्रीती टिळेकर (सध्या रा. खारघर, मुंबई) ही त्यांची मुलगी होती. सुनील टिळेकर गाडी चालवत होते. ते सुदैवाने या अपघातातून बचावले. अपघातानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत बाहेर आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. कार पाण्यात बुडाल्याने इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला.

    Maharashtra TimesAnjali Damania: रुपाली चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स; अंजली दमानियांचा दावा, बड्या मंत्र्यांची घेतली नावं!
    कुटुंबावर दु:खाचा डोंगर
    रामनवमीनिमित्त कुटुंबासह फोंडशिरस येथे आलेले टिळेकर कुटुंब परतीच्या प्रवासात होते. मुलाला नातेवाइकांकडे ठेवून त्याला परत घेण्यासाठी निघाले असताना हा अपघात घडला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    Maharashtra TimesPune Accident : पुण्यात ट्रक-स्कुटीची जोरदार धडक, 28 वर्षांच्या स्नेहल अहिनवे यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा
    अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस अन् बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. क्रेनच्या साह्याने मोठ्या प्रयत्नांनंतर कार बाहेर काढण्यात आली. या घटनेमुळे मोगराळे गावासह माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेग आणि नियंत्रण सुटणे ही अपघाताची प्राथमिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा