• Thu. Aug 6th, 2026
    Raigad News : ‘साहिल तुझा भाऊ तलावात…’; कॉल केल्यावर घटनास्थळी पोहोचला, पण क्षणात दु:खाचा डोंगर; कुटुंब पोहोचतं तोवर निहारचा करुण अंत

    Raigad Youth Dies in Ramdharaneshwar Lake : रायगडमधील अलिबाग तालुक्याक एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तलावात बुडून एका 26 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    अलिबाग निहार शेट्टी बुडून मृत्यू
    अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर येथील तलावात फिरण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निहार विजय शेट्टी (वय 26, रा. मेटपाडा, अलिबाग) असं मृत तरुणाचं नाव आहे.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, निहार विजय शेट्टीहा त्याचे मित्र-मैत्रीण आकांक्षा सुभाष उतेकर (वय 20, रा. वरसोली, अलिबा ग), राधिका महेश पाटील (वय 20, रा. पंतनगर, अलिबाग) आणि हेमंत महेश जगे (वय 24) यांच्यासोबत रामधरणेश्वर येथे फिरण्यासाठी गेला होता. सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास निहार तलावाच्या पाण्यात उतरला असता त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात यश आलं नाही. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

    Maharashtra TimesSatish Naikodi : वय वर्ष 50, काय उरलं आयुष्यात, परत कसं उभं राहायचं? क्राईम पेट्रोल फेम मराठी अभिनेत्याची फसवणूक, व्हिडिओत उद्विग्न सवाल

    भावाला फोन करतो तोवर…

    घटनेनंतर करण सचिन इंदुलकर यांनी मयत निहार विजय शेट्टी याचा भाऊ साहिल विजय शेट्टी यास भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच साहिल शेट्टी व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत निहारचा बुडून मृत्यू झाला होता. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. घटनेची माहिती मेटपाडा परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. निहारच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात निहारच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अनेकजण उपस्थित होते.

    Maharashtra TimesMumbai Crime : 12 लाखांच्या दागिन्यांची बॅग CSMT लोकलमध्ये विसरले, तब्बल 3 वर्षांनी चमत्कार, सोनं जसंच्या तसं; मुंबई पोलिसांनी कसा शोध लावला?

    लेकाच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

    निहार विजय शेट्टी याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. तो खासगी नोकरी करत असून शांत, मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारा तरुण म्हणून परिचित होता. त्याच्या अकाली निधनानं मेटपाडा परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पावसाळ्यात तलाव, नदी व धबधब्यांमध्ये पोहण्यासाठी किंवा पाण्यात उतरताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. निहारच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण अलिबाग शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा