Diva-Ratnagiri Passenger: कोरोना काळात दादर-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस दिवा जंक्शनवरून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर कोकणवासियांकडून अनेक वर्ष गाडी परत सुरू करण्याची मागणी होत आहे. पण एक्सप्रेसमुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा खोळंबा होत असल्यामुळे सध्या ही दिवा स्थानकावरूनच सुटेल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: कोकणवासीयांची पसंतीची गाडी असलेली ‘दादर-रत्नागिरी’साठी प्रवाशांना आता अनिश्चित काळापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या सीएसएमटी-कुर्ला पाचव्या/सहाव्या मार्गिका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दादर-रत्नागिरी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाला प्रकल्पाची कालमर्यादा विचारली असता भूसंपादन पूर्ण झाल्यावर ते निश्चित होणार असल्याने दादर-रत्नागिरी आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईतील प्रवाशांची संख्या अधिक
नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक वर्षातील महसूल वाढीच्या विक्रमाबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या प्रतीक गोस्वामी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील कार्यक्रमात रेल्वेचे सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेवरील लोकल विलंब, धीम्या गतीने सुरू असलेले १५ डब्यांचे काम आणि दादर-रत्नागिरीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. दादर-रत्नागिरी एक्सप्रेस दिव्यावरून सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये नाराजी आहे. लालबाग, परळसह दक्षिण मुंबईत आणि पश्चिम रेल्वेवर राहणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रवासी मागणी अधिक असल्याने ही गाडी पुन्हा दादरवरून सुरू होणार की नाही, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला.Mumbai Metro: ‘वचन दिया… पूरा किया!’ उद्घाटनाची तारीख ठरली, पण नेत्यांचा पत्ता नाही; मिरा-भाईंदर मेट्रो पुन्हा रखडली
‘सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिका प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झाल्यावर प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित होईल. सध्या दादरवरून ही गाडी चालवल्यास उपनगरी रेल्वेच्या वक्तशीरपणावर त्याचा परिणाम होतो. सर्वविचारांती २०२१ मध्ये ही गाडी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही स्पष्टीकरण महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी दिले.
Nashik-Kalyan Train: ‘नाशिक-कल्याण लोकल’ला रेड सिग्नल, घाटाची रुंदी कमी; तांत्रिक अडचणींमुळे लोकल सेवा अशक्य
‘त्या’ रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १६ वर्षांनी भरपाई
बोरिवलीला जाताना मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकलमधून पडून मृत्यू झाला असतानाही रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाने नकार दिला होता. तसेच रेल्वे अपघात न्यायाधिकरणानेही भरपाईचा दावा फेटाळला होता. अखेर न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द करत भरपाई देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने या कुटुंबाला १६ वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने ५ मार्च २०२१ रोजी दावा फेटाळल्याने भारती सोनावणे व त्यांच्या दोन मुलींनी अॅड. मोहन राव यांच्यामार्फत अपिलाद्वारे दाद मागितली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्या. राजेश पाटील यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा