• Sun. Jun 7th, 2026

    प्रवासात ओळख वाढवली; कल्याणमध्ये तिघा रिक्षा चालकांचा महिलेवर सामूहिक अत्याचार, पार्टीला बोलवून कुकर्म

    प्रवासात ओळख वाढवली; कल्याणमध्ये तिघा रिक्षा चालकांचा महिलेवर सामूहिक अत्याचार, पार्टीला बोलवून कुकर्म

    Kalyan Woman Assault : कल्याणजवळील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी महिला कल्याण पूर्वेकडे मैत्रिणीसोबत राहते. दररोज कल्याण ते भिवंडी असा रिक्षाप्रवास करणाऱ्या महिलेशी हेमंत चव्हाण याने ओळख वाढवली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : कल्याण पूर्वेकडे राहणाऱ्या सुरक्षारक्षक महिलेशी ओळख वाढवत कल्याणमधील एका रिक्षा चालकाने आपल्या आणखी दोन रिक्षा चालक मित्राच्या मदतीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. हेमंत चव्हाण, चेतन चव्हाण आणि उमेश वर्मा अशी आरोपींची नावे आहेत.

    काय झालं नेमकं?

    कल्याणजवळील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी महिला कल्याण पूर्वेकडे मैत्रिणीच्या घरी राहते. दररोज कल्याण ते भिवंडी असा रिक्षाप्रवास करणाऱ्या या महिलेशी हेमंत चव्हाण याने ओळख वाढवली. २६ मार्च रोजी ही महिला आपल्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी रात्री कल्याण बायपासजवळ थांबलेली असताना हेमंत याने फोन करून तिला कल्याणमध्ये येण्याबाबत विचारले. ओळख असल्याने ही महिला त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली, मात्र हेमंतने पार्टीबाबत विचारणा करत आपला मित्र चेतन याला बरोबर घेतले. पुढे डोंबिवली खंबाळपाडा परिसरात उमेश वर्मा हाही त्यांच्यासोबत आला. या महिलेला पार्टीच्या नावाखाली मद्य पाजण्यात आले. यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.
    Maharashtra TimesPune Crime : माझ्या सायलीची बॉडीही घरी आणता आली नाही, हातही लावू शकले नाही; बारामतीतील विवाहितेला पतीने संपवलं, आत्याचा टाहो

    पुण्यात महाविद्यालयीन तरुणीचा खून

    दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात माळशिरस (ता. पुरंदर) येथील २२ वर्षीय तरुणीचा खानवडी गावाच्या हद्दीत खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात खून, अत्याचार; तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Pune | ‘जैन मुनींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा…’, मराठा समाजाचा सरकारला इशारा

    महेंद्र प्रल्हाद गायकवाड (रा. माळशिरस) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अनिकेत विष्णू जाधव (वय २१, रा. माळशिरस) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नीलम गायकवाड (वय २२) असे मृत तरुणीचे नाव असून, ती सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात बीएच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होती.
    Maharashtra TimesPune Rains : वीस वर्षांची सावलीच ‘काळ’ बनून आली… पुण्यात पावसामुळे झाड कोसळलं, आडोशाला बसणाऱ्या फूल विक्रेतीचा करुण अंत
    एक एप्रिल रोजी कॉलेजला गेलेली नीलम सायंकाळी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिला सासवड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा