राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा उमेदवार देण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर जोरदार टीका केली असून, प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेमुळे निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे.
‘स्वतःची निवडणूक गंभीरपणे घेतली असती तर बरे झाले असते’; राहुरी पोटनिवडणुकीवरून विखे पाटलांचा थोरातांना टोला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापली असून राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच चुरशीचे होत आहे. काँग्रेसने या लढतीत उतरण्याचे संकेत देताच समीकरणे बदलू लागली आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीत काँग्रेसचा उमेदवार देणार आणि विजय मिळवणार, असा ठाम दावा करत निवडणुकीत दमदार एंट्रीची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हेअपक्ष म्हणून मैदानात उतरण्याच्या चर्चांमुळे आधीच गुंतागुंतीची झालेली परिस्थिती अधिकच पेचात अडकली आहे.
तनपुरे संपर्कात नसल्याचे थोरात यांनी सांगत या चर्चांवर थेट भाष्य टाळले असले, तरी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार का, हा मोठा सवाल उभा राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर आघाडीतील एकजूट टिकते की मतभेद उफाळून येतात याचीही मोठी परीक्षा ठरणार आहे.
“स्वतःची निवडणूक तेवढ्याच गंभीरतेने घेतली असती, तर बरे झाले असते”
काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेला भाजपकडूनही तितक्याच धारदार शब्दांत प्रत्युत्तर मिळाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर थेट निशाणा साधत राजकीय वातावरण अधिक तापवले आहे. थोरातांनी राहुरीची निवडणूक गंभीरपणे घेतली, यात हरकत नाही; पण त्यांनी स्वतःची निवडणूक तेवढ्याच गंभीरतेने घेतली असती, तर बरे झाले असते,असा टोला विखे यांनी लगावला.
Pune Accident : पुण्यात ट्रक-स्कुटीची जोरदार धडक, 28 वर्षांच्या स्नेहल अहिनवे यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा
काँग्रेसची अंतिम भूमिका, तनपुरे यांचा निर्णय आणि भाजपची रणनीती
या टीकेनंतर थोरात-विखे यांच्यातील राजकीय जुगलबंदीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन्ही नेत्यांतील ही शब्दयुद्ध आता प्रत्यक्ष प्रचारातही रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी, राहुरीची पोटनिवडणूक केवळ स्थानिक पातळीवरील न राहता, मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढत बनली आहे. काँग्रेसची अंतिम भूमिका, तनपुरे यांचा निर्णय आणि भाजपची रणनीती या तिन्ही गोष्टींवर राहुरीच्या रणांगणाचे भवितव्य ठरणार आहे.
Hina Baloch Pakistan Gay Claim : ‘पाकिस्तानमधील 80 टक्के पुरुष ‘गे’ तर 20 टक्के बायसेक्शुअल’; ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट हिना बलोच यांचा दावा
एकीकडे आघाडीची एकजूट टिकणार का, तर दुसरीकडे थोरात-विखे यांची जुगलबंदी किती रंगते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा