Nashik Women Assault Case : “लग्नाची हळद लावण्यासाठी त्याला कपडे काढायला सांगितले, मात्र तो कपडे काढत नव्हता” असा किस्सा पाडळी ग्रामस्थांनी सांगितला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबीन खान, नाशिक : सध्या भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे राज्यभरात चर्चेत असून अजूनही नवनवीन किस्से समोर येत आहे. अशोक खरात याची सासुरवाडी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील ग्रामस्थांनी अशोक खरातचे अनेक किस्से सांगितले. “लग्नाची हळद लावण्यासाठी त्याला कपडे काढायला सांगितले, मात्र तो कपडे काढत नव्हता कारण त्याच्या शरीरावर अनेक वार होते. त्याला आग्रह करून कपडे काढायला लावले त्यावेळी ते वार दिसले, त्याच वेळी आमच्या लक्षात आलं होतं की हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल, मात्र शिंदे कुटुंब गरीब असल्याने आणि लेकीचं चांगलं होईल या अपेक्षेने आम्ही त्यावेळी काही बोललो नाही” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
ग्रामस्थ काय म्हणाले?
अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात पाडळी गावात अत्यंत गरीब कुटुंबात लहानाची मोठी झाली आणि शिक्षण देखील तिथंच झालं. अशोक खरात फक्त काही विशेष कार्यक्रम असेल किंवा दुःखद प्रसंगीच पाडळीत यायचा. आम्ही त्याच्याकडे जायचो मात्र त्याचे गुण काही व्यवस्थित दिसले नाही. मोठी कामे घेऊन कोणीही त्याच्याकडे गेलेलं नाही. माझ्या जमिनीचा त्याने व्यवहार केला. चार लाख देतो म्हणाला, मात्र मला गडबड वाटल्याने मी त्याला जमीन दिली नाही, असं देखील एका ग्रामस्थाने म्हटले आहे. Pune Crime : माझ्या नातीला सांभाळा, शेजाऱ्यांकडे चिमुरडीला सोपवून आजी ड्युटीवर; सकाळी दोघी मृतावस्थेत, आळंदीतून दुसरा नवरा ताब्यात
कल्पना खरातची भावजय काय म्हणाली?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांची भावजय चंद्रकला खरात आजही पाडळी गावात एका छोट्याशा घरात राहतात. त्यांनी सांगितले की अशोक खरात फार कमी वेळा सासुरवाडी यायचे. माझी नणंद कल्पना खरात यांचा स्वभाव फार गरीब आहे. त्या वर्ष दोन वर्षातून फोन वरून संपर्क किंवा प्रत्यक्ष भेटीला यायच्या मात्र आता जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला काहीही माहिती दिलेली नाही.
नाशिकच्या भोंदूबाबाला व्हिसीद्वारे कोर्टात हजर केलं, सुनावणीत काय घडलं?
Ashok Kharat : 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली, खरातच्या ऑफिसात बरंच काही सापडलं; बायको देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता
केंद्रीय मंत्र्यांचं गाव आता खरातमुळे चर्चेत
माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील यांचा जन्मगाव असलेला सिन्नर तालुक्यातील पाडळी गाव आता मात्र भोंदू अशोक खरातची सासुरवाडी असल्याने चर्चेत आलंय. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव केंद्रात घेतलं जात होतं, मात्र या व्यक्तीमुळे आमच्या गावाचं नाव खराब होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा