• Sun. Jun 7th, 2026

    Solapur Crime: हातात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात डोरले, घरमालकिणीच्या दागिन्यांवर भाडेकरूची नजर; पैशांसाठी वृद्ध महिलेला संपवलं

    Solapur Crime: हातात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात डोरले, घरमालकिणीच्या दागिन्यांवर भाडेकरूची नजर; पैशांसाठी वृद्ध महिलेला संपवलं

    Tenant Kills Elderly House Owner: सोलापूरमध्ये एका तरुणाने वृद्ध महिलेला लुबाडत त्यांची हत्या केली आहे. महिलेच्या भावाला संशय आला असता त्यांनी तक्रार नोंदवली. तपासादरम्यान, सर्व प्रकार समोर आला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: शेअर बाजारात आलेल्या नुकसानी मुळे आणि पैसे मिळवण्यासाठी एका तरुण भाडेकरूने भयंकर कांड केले आहे. वृद्ध घरमालकिणीच्या अंगावरचे दागिने लुबाडून तिचा गळा टॉवेलने आवळून खून केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे. गंगुबाई कालिदास गडदे(वय 73,राहणार,हांडे गल्ली बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गंगुबाई कालिदास गडदे यांचे बंधू शशिकांत किसन वायकुळे (वय 64) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बार्शी पोलिसांनी चांगदेव गोवर्धन पाटील (वय 35,राहणार हत्तीज,जि सोलापूर ) याला वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

    महिलेच्या भावाकडून तक्रार

    गंगुबाई कालिदास गडदे या बार्शीतील हांडे गल्लीमध्ये आपल्या मालकीच्या वाड्यात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या वाड्यामध्ये सध्या अन्य दोन भाडेकरू चंद्रकांत सांगळे व महेश जामदारे हे राहत आहेत. भावाने अनेक दिवस कॉल करण्याचा प्रयत्न केला पण काही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे तो 27 मार्च रोजी वाड्यावर पाहण्यासाठी गेला असता, 25 मार्चला गंगुबाई घराला कुलूप लावून निघून गेल्याची माहिती मिळाली. त्या नंतर परतल्याच नाहीत असे भाडेकरूंनी सांगितले. त्यानंतर वायकुळे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली. Maharashtra TimesPune Crime: 21 वर्षाच्या तरूणाचा मसाज सेंटरच्या आड भलताच धंदा, पोलिसांकडून दोन तरूणींची सुटका; पुण्यातील पॉश परिसरात कारवाई
    आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर 25 तारखेला गंगुबाईंचा जुना भाडेकरू चांगदेव गोवर्धन पाटील (वय 35 वर्षे राहणार हत्तीज) हा आला होता, अशी माहिती मिळाली. त्याला चौकशीसाठी बोलावले असता तो कारणं देऊन गैरहजर राहीला. त्यानंतर बार्शी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरू केला. यावेळी मेडिकलच्या फुटेजमध्ये गंगुबाई पिवळ्या रंगाची साडी नेसून जात असताना दिसल्या. त्यावेळी चांगदेव त्यांच्या पाठलाग करताना दिसला. त्यानंतर बराच काळ प्रयत्न करत चांगदेव पाटील याला पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

    पोलिसांनी वायकुळेंसमक्ष चांगदेव पाटीलची गंगुबाई यांच्याबाबत विचारपूस केली. चांगदेवप खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. चांगदेव पाटीलचे शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्याला पैशाची गरज होती. तसेच गंगुबाई यांच्या हातात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात डोरले, सोन्याचे वेल व फुले असल्याचे पाहुन चांगदेवच्या मनात खोट निर्माण झाले. सोने मिळवून त्यातून आर्थिक अडचण भागवण्याच्या उद्देशाने चांगदेवने २५ मार्च रोजी दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान गंगुबाई कालिदास गडदे हिला चांगदेव याचे राहते घरी बोलवले. त्यांना लिंबू सरबतमधून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यावर त्यांच्या नाकाला टॉवेलने दाबून त्यांचा खून केल्याचे कबुल केले.

    Maharashtra TimesKalyan Crime : प्रवासात ओळख वाढवली; कल्याणमध्ये तिघा रिक्षा चालकांचा महिलेवर सामूहिक अत्याचार, पार्टीला बोलवून कुकर्म

    खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली

    वृद्ध गंगुबाई गडदे या मेल्याची खात्री झाल्यावर त्याांचा मृतदेह घरातील काळपट रंगाच्या पोत्यात भरून दुपारी चांगदेव याने हुंडाई कारने डिकीमध्ये नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यामुळे वायकोळे यांच्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी चांगदेव गोवर्धन पाटील यांच्या विरोधात वृद्धे गंगुबाईचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा