IMD Rain Alert 3rd April: राज्यात अवकाळी पावसाचं संकट अजून कायम राहणार आहे. येत्या काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ, रायगडसह ठाणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पुणे आणि नाशिक जिल्ह्याला गुरूवारी अवकाळी पावसाने झोडपलं होतं. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने जणजीवन विस्कळीत झाले आहे. अनेत जणांचा बळी जाऊन प्राण्यांचाही बळी गेला आहे. त्यासह मुंबईतही काही ठिकाणी काल हलक्या सरींचा पाऊस झाल्याची नोंद होती. येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आबे.
पुढील 24 तास इशारा
भारतीय हवामान विभागाने, पुढील 24 तासांसाठी मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातही हलक्या सरींच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. मुंबईतही पारा 33 अंश सेल्सिअसवर पोहोचला. तसेच, कोकणातही तापमान कमी झाले असून काही काळासाठी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
अरबी समुद्र आणि आसपासच्या प्रदेशातील हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आणि उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान अस्थिर झालं आहे. त्यामुळे येत्या 1 -2 दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावासची शक्यता आहे. दरम्यान, या बदलत्या हवामानाचा फटका उत्तर भारतात सर्वाधिक ठिकाणी बसला असून पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यातही पावसाची शक्यता आहेय
पिंपरीत मुसळधार; पुनावळे भुयारी मार्ग ठप्प
पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका पुनावळे परिसराला बसला असून, भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली. अचानक पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली आणि दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
Maharashtra Weather: एप्रिलमध्ये कोसळधारा! पुण्यात विक्रमी पाऊस, नाशिकमध्ये गारपीट, तर विदर्भात दाणादाण
शहरात दुपारपासून पावसाचा जोर कायम असल्याने भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही वाहनांनी पाण्यातच बंद पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक वळवण्याचा निर्णय घेऊन रावेत, भुमकर चौक आणि ताथवडे या मार्गांकडे वाहनांचा ओघ वळवला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा