Raigad Accident: 38 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघाता झाला असून यामध्ये 8 ते 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामागचं नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात रायगड जिल्ह्यात नागोठणे जवळ असलेल्या सुकळी खिंडीत झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. नागोठणे जवळ सुकेळी खिंडीत ट्रॅव्हल्स बस चालकाचे नियंत्रण सुटून बस पलटल्याने हा मोठा भीषण अपघात झाला आहे.
एक महिला बस खाली अडकली
या अपघातात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आठ ते नऊ प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांना पुढील उपचाराकरिता नवी मुंबई व मुंबई अशा ठिकाणी हलवण्यात आले आहे. या अपघातात एक महिला बसच्या खाली अडकली होती पोलीस प्रशासन स्थानिक नागरिक तसेच SVRSS टीमच्या एकत्रित प्रयत्नाने त्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. SVRSS बचाव पथकाच्या ग्रुपने घटनास्थळी जखमींना बाहेर काढणे हॉस्पिटलला हलवणे अशा स्वरुपाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.Ratnagiri Crime: पैशांच्या वादात मैत्रिणीने मित्रासोबत मिळून मुंबईतल्या व्यापाऱ्याला संपवलं, नंतर जाळलं; शस्त्रक्रियेच्या रॉडने ओळख पटली
जखमींवर उपचार सुरू
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारे एका खाजगी ट्रॅव्हल्स ला हा भीषण अपघात झाला आहे सुकेळी खिंडीतून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात झाल्याचे कळताच आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व बचाव पथकाच्या सहकार्याने तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आल. या अपघातातील काहीजण गंभीर जखमी आहेत त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
Varandha Ghat Closed: पुणे-कोकण जोडणारा वरंधा घाट ‘शटडाऊन’, 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?
वाहनचालकाचे नियंत्रण सुटण्यामगाचं कारण अद्याप स्पष्ट नाही. या संदर्भात पोलिस अजून तपास करत असून बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का दुसऱ्या काही कारणामुळे हा अपघात घडला आहे याचा शोध सुरू आहे. दरम्यान, यावेळी बसमध्ये 38 प्रवासी होते. त्यापैकी 8-9 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा