Hinjewadi-Shivajinagar Metro: पुणे मेट्रो 3ची डेडलाइन गेली अनेक महिने पुढे ढकलली जात आहे. आता मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करून पहिला टप्पा जूनपर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. दरम्यान, संपूर्ण मार्गिका सप्टेंबरपर्यंत सुरू होईल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीन जून महिन्यापासून सुरू होणार असल्याची शक्यता आहे. या मार्गावरील 12 स्थानकांसह ही मेट्रो मार्गिका सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण 23 स्थानकं असून, मे अखेरपर्यंत या मार्गावरील 12 स्थानकांचं काम पूर्ण करण्याचं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)चं उद्दिष्ट आहे.
सप्टेंबरमध्ये संपूर्ण मार्गिका
पीएमआरडीचे नवनियुक्त आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना PMRDA मे अखेरपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण करून जूनपर्यंत ही सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे अशी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, संपूर्ण 23.2 किमी लांब मार्गिका येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.Mumbai Metro : मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो 3 एप्रिल पासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
इतर 11 स्थानकांवर सध्या प्रेवश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर पायाबूत सुविधांचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या उर्वरित स्थानकांच्या कामाला विलंब होत आहे. अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. हिंजवडी आय-टी पार्कमधील कर्मचारी आणि रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली ही मेट्रो मार्गिका सध्या अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण प्रकल्पाचे 94.2 टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. तसेच, या 12 स्थानकांवरील बहुतेक चाचण्या पूर्ण झाल्या असून केवळ सिग्नलिंगच्या तांत्रिक चाचण्या सुरू आहेत.
चाचणी आणि पाहणी पूर्ण
यावेळी चौधरी यांनी मेट्रोच्या बांधकामाचा आढावा घेतला असून तांत्रिक अडचणी, स्थानकांची सज्जता इतर गोष्टी तपासल्या. तसेच कंत्राटदाराला उर्वरित कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने जूनपर्यंत मेट्रो मार्गावरील सर्व प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गांवरील सुविधांची कामं पूर्ण करून मेट्रो सुरू करण्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
Mumbai Local Video: अरे, ट्रेन आली! मुलीवरून दोन शाळकरी पोरांमध्ये वाद, थेट रुळांवर हाणामारी; मुलुंड रेल्वे स्थानकावर गोंधळ आयुक्त अभिजीत चौधरींनी असेही सांगितले की त्यांनी या मार्गाची स्वतः पाहणी केली असून लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. दरम्यान, ही मार्गिका सुरू होताच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा