• Sun. Jun 7th, 2026
    लग्नाच्या आमिषाने नाशकात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, रुम उपलब्ध करुन देणाऱ्या लॉज मालकावरही गुन्हा

    Nashik Minor Girl Assault : राधाकृष्ण हॉटेल चालकाने कागदपत्रांची पडताळणी न करता लॉजमध्ये रुम उपलब्ध करून देऊन संशयितास गुन्हा करण्यास सहकार्य केल्याने त्यालाही अटक करण्यात येऊन सहआरोपी करण्यात आले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची चित्रफित समाजमाध्यमात व्हायरल केल्या प्रकरणात दाखल पोक्सो गुन्ह्यात सहआरोपींची संख्या वाढली आहे. अंजनेरी शिवारातील लॉज चालक हर्षद अशोक बोडके (३३, रा. तळवाडे) यास अटक करण्यात आली.

    काय आहे प्रकरण?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अत्याचार व पोक्सोसारख्या गुन्ह्यांत हॉटेल व लॉजमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व लॉज मालक/चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

    लॉजवर नेऊन शारीरिक संबंध

    त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी यश दत्तात्रय दिवटे (२२, रा. पाटील गल्ली, त्र्यंबकेश्वर) याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अंजनेरी येथील राधाकृष्ण हॉटेल व लॉज येथे नेऊन शारीरिक संबंध ठेवले. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर संशयितास अटक करण्यात आली होती.

    कागदपत्रांची पडताळणी न करता रुम

    त्यानंतर अधिक तपासात राधाकृष्ण हॉटेलचा चालक बोडके याने कागदपत्रांची पडताळणी न करता लॉजमध्ये रुम उपलब्ध करून देऊन संशयितास गुन्हा करण्यास सहकार्य केल्याने त्यालाही अटक करण्यात येऊन सहआरोपी करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित, राजेंद्र देवरे, संदीप नागरे, भारत भावले तपास करीत आहेत.
    Maharashtra TimesPune Crime : माझ्या सायलीची बॉडीही घरी आणता आली नाही, हातही लावू शकले नाही; बारामतीतील विवाहितेला पतीने संपवलं, आत्याचा टाहो

    अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी खंडणीचा गुन्हा

    त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात यापूर्वी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पोक्सो दाखल झाला. अत्याचार प्रकरणात लॉजचा वापर झालेला असल्यास मालक-चालक यांना सहआरोपी म्हणून सहभागी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    Ashok Kharat Case : ऑफिसबॉय नीरज जाधव आणि भोंदूबाबा समोरासमोर, SIT चौकशीत खरातचा खळबळजनक दावा

    अत्याचारातील आरोपींविषयी गुप्तता

    दुसरीकडे, भानखेडा मार्गावर २८ मार्च रोजी एका १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक हल्ल्यातून अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीसुद्धा सुनावण्यात आली आहे. मात्र, घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केलेली नाही. या प्रकारामुळे शहरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    Maharashtra TimesKalpana Ashok Kharat : वयात मोठं अंतर, गरिबीतून ऐशोआरामात, सुनीताची ‘कल्पना’ झाली, माहेरशी नातं तुटलं; अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू
    पीडित युवती तिच्या मित्रासोबत दुचाकीने भानखेडा मार्गावरून जात होती. याचवेळी पाच आरोपींनी त्यांना वाटेत अडवले. या टोळक्याने दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन एकाने तरुणीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि गुन्हे शाखेच्या मदतीने पाचही संशयितांना ताब्यात घेतले. एकीकडे या गंभीर घटनेमुळे महिला संघटना, विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. आरोपी अटकेत असतानाही त्यांचे वय किंवा नावे उघड करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा