Thane Ulhasnagar Woman Ends Life : ठाण्यातील उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये हुंडाबळीची घटना समोर आली आहे.
उल्हासनगर विवाहित नित्या राय आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये हुंडाबळीची घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित 28 वर्षीय महिलेनं सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. सदर महिला आणि तिचा पती हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. विवाहित महिलेनं जीवन संपवल्यानं नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळं उल्हासनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सासरच्या लोकांकडून ‘माहेरहून पैसे घेऊन ये’, असा तगादा
नित्या राय असं मयत विवाहितेचं नाव असून तिचं पाच वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या गौरव राय याच्याशी विवाह झाला होता. नित्या देखील उच्चशिक्षित होती. या लग्नासाठी वडिलांनी रोख स्वरूपात हुंडा देऊन लग्न लावून दिलं. सुरुवातीचे काही वर्ष चांगले गेले असता अलीकडच्या दिवसात दोघांमध्ये वाद सुरू झाले. सासरच्या लोकांकडून ‘माहेरहून पैसे घेऊन’, ये असा तगादा लावून सतत छळ करण्यात आला. असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबाने केला आहे.
Farm Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेची नवी यादी जाहीर; साडेतीन लाख शेतकऱ्यांचा समावेश, लाभ मिळण्यासाठी कोणती प्रक्रिया?
पती सासू आणि आजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती सासू आणि आजी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे. उच्चशिक्षित असलेल्या एका विवाहितेनं केलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनं उल्हासनगरमध्ये खळबळ
दरम्यान, राज्यातील अनेक भागात हुंड्यासाठी विवाहित महिलांना त्रास दिल्याचा घटना घडत आहेत. या त्रासाला कंटाळूनच काही ठिकाणी महिला टोकाचं पाऊल देखील उचलताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशा घटना घडू नये म्हणून प्रशासन कारवाई देखील करत आहे. अशातच उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लग्नात भरपूर हुंडा देऊन देखील लग्नानंतर विवाहित महेला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होते. पैसे आणण्यासा सांगितलं जात होतं, अशातच महिलेनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
Marathwada Rain Update : दोन दिवस धो-धो बरसला, पण पुन्हा विश्रांती, मराठवाड्यात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा; हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज
जवानाच्या पत्नीने लेकरासह स्वत:ला संपवलं
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. प्रत्येकाच्या घरी गणेश उत्सवाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु होती. मात्र जळगाव शहरातील 28 वर्षीय हेमांगीच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. याच आनंदाच्या वातावरणात जळगाव शहरात एक अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली, जिने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले आणि सर्वांचेच मन सुन्न करून सोडले. 28 वर्षीय आईने आपल्या पाच वर्षाच्या मुलासह स्वत:ला संपवलं.
महाजन कुटुंबावर दु:खाचा डोंगर
जळगावमधील तळेले कॉलनीतील ‘विघ्नहर्ता’ चौकाजवळ राहणाऱ्या महाजन कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 28 वर्षांच्या हेमांगिनी निखील महाजन यांनी आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या निष्पाप, गोंडस शौर्यला सोबत घेऊन आयुष्याचा प्रवास कायमचा थांबवला. दोघांनीही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा