• Sun. Jun 14th, 2026
    Mumbai News: 12 वर्षीय मुलीला असह्य वेदना; पोटातून काढला मोठा केसांचा गोळा, 3 तास चालली शस्रक्रिया

    Mumbai News: पोटाच्या वरच्या भागात छेद देऊन सुमारे १६ बाय १४ सेंटीमीटर आकाराचा केसांचा गोळा सुरक्षित बाहेर काढण्यात आला.

    मुलीच्या पोटातून काढला केसांचा गोळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: भूक न लागणे, उलट्या होणे, अशा तक्रारी असलेल्या १२ वर्षीय मुलीच्या वैद्यकीय चाचण्या केल्या असता, तिच्या पोटात केसाचा मोठा गोळा असल्याचे आढळले. हा गोळा इतका मोठा होता की, त्याने पोटाची ९० टक्क्यांहून अधिक जागा व्यापली होती. वैद्यकीय शस्त्रक्रियेनंतर हा केसांचा गोळा काढण्यात आला. केस गिळण्याची सवय असलेल्या व्यक्तीस अशा स्वरूपाचा त्रास होतो.

    या मुलीचे वजन ३९ किलो इतके आहे. तिला कोणताही गंभीर आजार नव्हता, मात्र शारीरिक विकास वयाच्या मानाने अत्यंत धीम्या गतीने होत होता. त्यामुळे वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये मुलीच्या पोटात केसांचा गोळा असल्याचे निदान झाले. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी विभागातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी पोटामध्ये डाव्या बाजूला वरच्या भागात एक गाठ असल्याचे सांगितले. रक्ततपासणीनंतर सिटी स्कॅनमध्ये पोटाच्या पोकळीमध्ये हा गोळा दिसत होता. अशा स्वरूपाच्या व्याधीला ‘ट्रायकोबेझोअर’ असे म्हटले जाते.

    Maharashtra TimesNCP Politics: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पदच्युत? राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या पत्राने वाद, पदांचा उल्लेख नाही
    या आजाराचे निदान करण्यासाठी ‘अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइन एण्डोस्कोपी’ करण्यात आली. त्या वैद्यकीय चाचणीमध्ये पोटापासून लहान आतड्याच्या सुरुवातीपर्यंत पसरलेला केसांचा एक मोठा गोळा दिसून आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बालरोग शस्त्रक्रिया विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. रसिकलाल शहा यांनी ओपन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

    Ritu Tawade यांचं ‘ते’ विधान, घशाची समस्या नाहीशी, राऊतांकडून टीका, महापौर काय म्हणाल्या?

    तीन ते चार वर्षांत आकारमान वाढले
    केसाचे पचन होत नाही. एखादी व्यक्ती दीर्घकाळ ते गिळत राहिल्यानंतर पोटात एक घट्ट गोळा तयार होतो. या प्रकरणात हा गोळा तीन ते चार वर्षांत हळूहळू विकसित झाला होता. मोठे ‘ट्रायकोबेझोअर’ एंडोस्कोपीने काढणे कठीण असते, त्यासाठी ओपन शस्त्रक्रिया करावी लागते. हा एक मानसिक आजार असतो. यामध्ये व्यक्ती स्वतःचे केस उपटून खाते. अनेकदा हे वर्तन मानसिक ताण, चिंता किंवा भावनिक समस्यांशी संबंधित असते. बऱ्याच प्रकरणांमध्ये हे निदान योग्य वेळी होत नाही.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा