Nashik Women Assault Case : अशोक खरात याने पीडितेवर ताबा मिळविण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली, याचे सविस्तर चित्रण यावेळी करण्यात आले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या मोबाइलमध्ये दोन हजारांहून अधिक संशयास्पद नंबर आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे कोणत्याही नावाशिवाय हे नंबर मोबाइलमध्ये जतन केले असून, याचा वापर कोणाशी संवाद साधण्यासाठी केला जात होता, याची चौकशी होणार आहे. याकरिता मोबाइलची ‘क्लोन कॉपी’ तयार केली असून, तपासासाठी सायबरतज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.
खरातच्या कार्यालयात सीन रिक्रिएशन
न्यायालयाने खरातच्या पोलिस कोठडीत वाढ केली असून, तपासादरम्यान दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. खरातच्या दालनात नेमके काय घडायचे हे जाणून घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी (दि. ३०) कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात न्यायवैद्यक पथकासह तपासणी केली. एका पीडित महिलेला सोबत घेऊन घडलेल्या गुन्ह्याचा थरार (सीन रिक्रिएशन) पुन्हा उभा करण्यात आला. खरात याने पीडितेवर ताबा मिळविण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली, याचे सविस्तर चित्रण यावेळी करण्यात आले. त्याने पीडितेला कार्यालयात कसे बोलावले, सुरुवातीला काय संवाद साधला, याची माहिती घेण्यात आली.
Ashok Kharat Case : ऑफिसबॉय नीरज जाधव आणि भोंदूबाबा समोरासमोर, SIT चौकशीत खरातचा खळबळजनक दावा
संमोहनासाठी काय वापरलं?
खरातने विशिष्ट मंत्र म्हणून पीडितेवर मानसिक नियंत्रण मिळवल्याचा आरोप असल्याने हे मंत्रतंत्र म्हणतानाची त्याची कृती आणि पीडितेची तत्कालीन स्थिती याचे निरीक्षण तपास पथकाने नोंदविले. पीडितेची शुद्ध हरपण्यासाठी किंवा संमोहित करण्यासाठी तिला काही विशिष्ट पदार्थ खायला किंवा प्यायला कसे दिले होते, आदींचा तपास एसआयटीने केला आहे. Crime News : इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली
महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत
एसआयटीला काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. ही कागदपत्रे खरातच्या संशयास्पद व्यवहारांशी किंवा पीडितांच्या माहितीशी संबंधित असावीत, असा अंदाज आहे. स्थानिक पातळीवरील पडताळणीनंतर ही कागदपत्रे तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. Crime News : बायको माहेरी गेली, नौदल कर्मचाऱ्याने प्रेयसीला घरी बोलावलं, दिवसभर वेळ घालवला, संध्याकाळी जीव घेतला
‘बुवाबाजीची गरज कधीच भासली नाही’ : गोऱ्हे
दरम्यान, ‘नाशिक येथील व्यक्तीच्या भेटीबाबतच्या बातम्या कपोलकल्पित असून, आपली राजकीय कारकीर्द स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आहे,’ असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. “डॉ. गोऱ्हे या गेल्या सात ते आठ वर्षांपासून भोंदूबाबा अशोक खरात याच्या संपर्कात होत्या. आमदारकी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी त्या खरातकडे आपले ‘भविष्य’ जाणून घ्यायला जात होत्या” असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या केवळ बदनामी करण्याच्या हेतूने रचल्या गेल्या आहेत. असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा