Chhatrapati Sambhajinagar News: हल्ल्यानंतर नातेवाईकांनी तरुणाला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दिवसाढवळ्या थरार! मेडिकलमध्ये घुसून २२ वर्षीय तरुणाला संपवलं(फोटो– Lipi)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहर परिसरातील हर्सूल येथील ‘लाईफ लाईन’ मेडिकलमध्ये घुसून टोळक्याने २२ वर्षीय मेडिकल चालकाचा चाकूने पोटात वार करून निर्घृण खून केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास कोळठाणवाडी रोडवरील करीमनगर भागात ही रक्ताळलेली घटना घडली. घटनेनंतर आरोपी तात्काळ पसार झाले असून, या धक्कादायक प्रकारामुळे हर्सूल परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेख फैजल अब्दुल कादर असे मयत तरुणाचे नाव
या प्राणघातक हल्ल्यात शेख फैजल अब्दुल कादर ( वय २२, रा. शरीक कॉलनी, किराडपुरा ) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. फैजल याने डी-फार्मसीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी करीमनगर येथे स्वतःचे मेडिकल सुरू केले होते. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फैजल नेहमीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या मेडिकलमध्ये बसलेला होता. त्यावेळी अचानक काही तरुण तेथे आले आणि त्यांनी फैजलसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर टोळक्यातील एकाने धारदार चाकू काढून थेट फैजलच्या पोटात वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फैजलला सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
खुनाचे ठोस कारण अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू
हा खून कोणी आणि नेमक्या कोणत्या कारणातून केला, याचे ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा