• Sun. Jun 14th, 2026
    Ahilyanagar News : अवकाळीने तोंडचा घास हिरावला, वीज कोसळल्याने घरचा कर्ता माणूस गेला; खेडकर कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी संकट

    Ahilyanagar Farmer Dies due to Lightning Strike : अहिल्यानगमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालच आहे. पण वीज कोसळल्याने एका शेतकर्‍याचा मृत्यू देखील झाला आहे.

    पाथर्डी रघुनाथ खेडकर वीज कोसळून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील पार्थडी तालुक्यातील मालेवाडी येथे निसर्गाच्या तडाख्याने एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करत असताना अचानक कोसळलेल्या विजेने शेतकरी शिवाजी रघुनाथ खेडकर (वय ५४) यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेत त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर हे नेहमीप्रमाणे सायंकाळी आपल्या शेतात काम करत होते. दरम्यान, अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. क्षणातच वीज कोसळून खेडकर यांना जबर धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. त्यांच्यासोबत असलेला कुत्राही या दुर्घटनेत मृत झाला.

    शेतात मृतावस्थेत आढळले

    खेडकर बराच वेळ घरी न आल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी शेतात धाव घेतली असता खेडकर मृतावस्थेत आढळून आले. शेतातील जनावरे घरी परतली, मात्र खेडकर बराच वेळ घरी न आल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी शेतात धाव घेतली असता खेडकर मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेनं मालेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार मोनिका राजळे यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला सूचित करत पीडित कुटुंबाला त्वरित मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत.
    Maharashtra TimesAshok Kharat : खरातने ताबा मिळवायला कोणती पद्धत वापरली? पीडितेसह SIT चं सीन रिक्रिएशन, गुन्ह्याच्या थराराचं सविस्तर चित्रण

    शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

    दरम्यान, सायंकाळी परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा, भाजीपाला आणि रब्बी पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आलं आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसही अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नुकसानग्रस्त पिकांचं तात्काळ पंचनामे करून पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी, तसेच कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात तीन दिवस पावसाचा अंदाज, मुंबई, पालघर, ठाण्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस; कोकणात ‘यलो अलर्ट’

    साताऱ्यात ‘अवकाळी’ने जीव घेतला

    राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातही हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला तर वाई आणि खंडाळा तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेसह 34 मेंढ्या ठार झाल्या आणि एक मेंढपाळ जखमी झाला आहे. वादळी वाऱ्याने कराडच्या प्रीतिसंगम बागेतील झाडाची फांदी पडून काही वटवाघळे मृत्युमुखी पडली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा