• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai Melody Road: ‘मेलडी रोड’च्या निर्णयावर महापालिकेचा यू-टर्न; फक्त रात्री बॅरिकेड्स, दिवसभर नियमित वाहतूक सुरू

    Mumbai Melody Road: ‘मेलडी रोड’च्या निर्णयावर महापालिकेचा यू-टर्न; फक्त रात्री बॅरिकेड्स, दिवसभर नियमित वाहतूक सुरू

    Coastal Road: मेलडी रोडवर होणाऱ्या आवाजामुळे आठवड्यातीस तीन दिवस मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परिसरातील नागरिकांना सतत होणाऱ्या आवाजाबद्दल केलेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला. पण सोमवारी महापालिकेने हा निर्णय बदलला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मरिन ड्राइव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावर संगीतमय मार्ग (मेलडी रोड) तयार करण्यात आला आहे. यामुळे मोठा आवाज येत असल्याने त्याचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील स्थानिकांना होत आहे. याची दखल घेत महापालिकेने रात्रीच्या वेळी या ५०० मीटरच्या भागात बॅरिकेडिंग करण्याचे ठरविले आहे.

    संगीतमय मार्ग (मेलडी रोड) बंद करण्यात आलेला नाही किंवा काढून टाकलेला नाही. याव्यतिरिक्त वेळेत या मार्गावरून नियमितपणे वाहतूक सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेने उभारलेल्या सागरी किनारा मार्गावर नरिमन पॉइंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर हा अभिनव प्रयोग साकारण्यात आला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास ‘जय हो’ या गीताची धून वाहनात बसून ऐकू येते. रात्रीच्या वेळी या ५०० मीटर भागापुरती बॅरिकेडिंग करण्याचे ठरविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त वेळेत या मार्गावरून नियमितपणे वाहतूक सुरू राहील, असे महापालिकेसने सोमवारीे स्पष्ट केले.

    Maharashtra TimesMumbai Melody Road: मुंबईतील ‘म्युझिकल रोड’वर फुल स्टॉप! आठवड्यातील 3 दिवस बंद राहणार मार्ग; 6 कोटींच्या प्रयोगाला स्थानिकांचा विरोध

    समृद्धीवरही मेलडी रोड?

    हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईतील कोस्टल रोडवर मेलडी रोड तयार करण्यात आला आहे. 6 कोटी रुपये खर्च करून या मार्गावर मेलडी सेगमेंट उभारण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी मेलडी रोडचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान, हा प्रकल्प शिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या कल्पकतेतून साकार झाला असून असाच प्रयोग समृद्धी महामार्गावरही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesMumbai Melody Road: 6 कोटींचा खर्च करून बनवला ‘मेलडी रोड’, पण सतत वाजणाऱ्या गाण्याने नागरिक त्रस्त; आवाजाचा अभ्यास सुरू

    ‘पथविक्रेता समिती’चा निकाल जाहीर

    मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या अंतर्गत सर्व आठ समिती मिळून एकूण ५४ सदस्य निवडून आले. तर १० जागांवर उमेदवार नव्हते. निवडून आलेल्या ५४ सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रे वाटली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा