Ashok Kharat Son Arrested : शिर्डी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. SIT पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले असून, पत्नी कल्पना खरात यांच्या शोधासाठी पोलिसांनी आता शोधमोहिम सक्रिय केली आहे.
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलाला अटक, एसआयटीची कारवाई, पत्नीचा शोध सुरु(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक: शिर्डीतील जमीन गैरव्यवहार आणि सावकारी प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मूळ मालक शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीनंतर शिर्डी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, तपास यंत्रणांनी आता आपला मोर्चा खरातच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) सक्रिय झाले असून, खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकेसाठी पोलिसांनी थेट त्यांच्या ‘तृप्तबाला’ बंगल्यावर धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे, बंगल्याचा दरवाजा उघडण्यास नकार दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क शेजारील भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला.
यावेळी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात मिळून आली नसली तरी, चौकशीसाठी खरातच्या मुलाला हर्षवर्धन अशोक खरात याला पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून खरातच्या साम्राज्याभोवती अटकेचा फास आवळला जात आहे.
तपास यंत्रणांची धडक कारवाई
आतापर्यंतच्या माहितीनुसार, ३ महिला अधिकारी आणि १ पुरुष पोलीस अधिकारी अशा पथकाने कर्मयोगी नगर येथील खरातच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली आहे. शिर्डी लगतच्या निघोज भागातील गट नंबर १०६/२ या जमिनीच्या व्यवहार प्रकरणी ही कारवाई केली जात आहे.
Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची विक्री; पोलिसांची धडक कारवाई, तिघांना अटक, सर्व साहित्य जप्त
खरातच्या पाशात कुटुंबीय अडकले
भोंदूगिरी आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेला ‘कॅप्टन’ ऊर्फ अशोक खरात याच्या पाशात आता त्याचे कुटुंबीयही अडकताना दिसत आहेत. एसआयटीने खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकादमीत चौकशीसाठी नेले असून, दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. अटकेच्या भीतीने कल्पना खरात सध्या फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.
खरातची सखोल चोकशी
दरम्यान, गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसआयटी चौकशीत खरातने महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे कशाप्रकारे शोषण केले, याचे अनेक धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेष म्हणजे, या भोंदूचे धागेदोरे अनेक बड्या राजकारण्यांशी जोडलेले असल्याने या प्रकरणात आणखी काय काय घडणार आहे, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा