• Sat. Jun 13th, 2026

    Reels Star Surendra Patil : घरातील शू-रॅकमध्ये गुप्त कप्पा, पोलिसांच्या छाप्यात अवैध शस्त्रसाठा सापडला, प्रसिद्ध रील्स स्टार सुरेंद्र पाटीलला पुन्हा अटक

    Reels Star Surendra Patil : घरातील शू-रॅकमध्ये गुप्त कप्पा, पोलिसांच्या छाप्यात अवैध शस्त्रसाठा सापडला, प्रसिद्ध रील्स स्टार सुरेंद्र पाटीलला पुन्हा अटक

    Reels Star Surendra Patil Illegal Arms Arrest : कल्याणमधील रील्स स्टार सुरेंद्र पाटील याला पुन्हा अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ७ पिस्तुल, ३७० काडतुसे आणि इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

    रील्स स्टार सुरेंद्र पाटीलला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे (डोंबिवली) : ठाण्यातील डोंबिवली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर ‘गँगस्टर स्टाईल’ व्हिडिओमुळे प्रसिद्ध असलेला ‘रील स्टार’ सुरेंद्र पांडुरंग पाटील याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. ५५ वर्षीय पाटील हा बिल्डर असून त्याच्यावर यापूर्वीही बलात्कारासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच तो एका प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांतच त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

    शू-रॅकमध्ये गुप्त कप्पा

    मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे क्राईम ब्रांचने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दावडी येथील त्याच्या बंगल्यावर छापा टाकला. त्यादरम्यान घरातील शू-रॅकमध्ये एक गुप्त कप्पा आढळून आला. त्या कप्प्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लपवून ठेवलेला होता. या कारवाईत पोलिसांनी ७ बंदुका, ३७१ जिवंत काडतुसे आणि १६७ एअर गनच्या गोळ्या जप्त केल्या. याशिवाय तलवार, चाकू, कोयते आणि इतर धारदार शस्त्रेदेखील जप्त करण्यात आली. या शस्त्रांची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हा संपूर्ण शस्त्रसाठा वापरासाठी तयार स्थितीत होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या मोठ्या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे.
    Maharashtra TimesShivdeep Lande : बहिणी पाठ फिरवतात, बायकोही साथ सोडते, पण मुलगी बापासाठी जीव धोक्यात घालते; शिवतारेंना लेकीचं किडनीदान, पती शिवदीप लांडेंना अश्रू अनावर

    इंस्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स

    विशेष म्हणजे सुरेंद्र पाटील याचे इंस्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून तो या शस्त्रांचा वापर व्हिडिओमध्ये ‘प्रॉप्स’ म्हणून करत असल्याचा दावा करत आहेत. मात्र पोलिस या दाव्याची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणी पाटील याच्यावर आर्म्स अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
    Maharashtra TimesAhilyanagar News : अवकाळीने तोंडचा घास हिरावला, वीज कोसळल्याने घरचा कर्ता माणूस गेला; खेडकर कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी संकट
    शस्त्रसाठा कुठून आला? यामध्ये कोणाचा हात आहे? या मागे मोठा कट होता का? याविषयी पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मते, सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अवैध शस्त्रांचा वापर करण्याची धोकादायक प्रवृत्ती या घटनेतून समोर आली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा