• Tue. Jun 16th, 2026
    एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन तुतारी’, दिल्ली दौऱ्यानंतर हालचाली, शरद पवारांचे खासदार शिवसेना प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा

    NCP SP MPs to join Shiv Sena : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे ऑपरेशन तुतारी करण्यात येणार असल्याची चर्चा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तशा हालचाली सुरु झाल्याचे बोलले जाते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात २०२२मध्ये शिवसेनेच्या आमदारांच्या फोडाफोडीचे नाट्य बरेच गाजल्यानंतर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. आता पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे ऑपरेशन तुतारी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तशा हालचाली सुरू झाल्याचे बोलले जाते.

    शरद पवारांचे खासदार शिवसेनेत जाण्याची चर्चा

    मागच्या काळात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि काही खासदारांसह भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता आणली होती तर दिल्लीतील केंद्र सरकारचे हात बळकट केले होते. त्यानंतर काही महिन्यांत अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. या दोन्ही घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची इतर सर्वच पक्षांनी धास्ती घेतली आहे. काँग्रेसचे अनेक नेते या ‘ऑपरेशन लोटस’मुळे भाजपच्या गळाला लागले. आता राज्यात पुन्हा काही खासदार शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे.
    Maharashtra TimesAshok Kharat : खरातच्या मोबाईलची क्लोन कॉपी मिळाली, सांकेतिक मेसेज अन् विशिष्ट स्वरुपात नावं सेव्ह, SIT च्या हाती धागेदोरे

    शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर हालचाली

    अलिडकेच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला धक्का मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांनीही अलिकडेच याला दुजोरा देणारे वक्तव्य केले आहे. ‘मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की, राजकारणात काहीतरी होणार आहे. राज्यातील राजकारणात मोठा भूंकप होणार आहे. मग ते ऑपरेशन टायगर होईल की ऑपरेशन तुतारी होईल की इतर काही होईल हे योग्य वेळ आल्यानंतर समजेल. राजकारणात योग्य वेळेला खूप महत्त्व असते. तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर नक्की सांगू’, असे त्या म्हणाल्या होत्या.

    महिला आयोग काय काय करू शकतं? अधिकारांमध्ये किती ताकद?

    Maharashtra TimesAditi Tatkare : राष्ट्रवादीच्या पोस्टरवर अजितदादा-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब, टीकेनंतर आदिती तटकरे म्हणाल्या, फोटोतून आमची निष्ठा ठरवू नका

    पवार गटातील ज्येष्ठ नेत्याचं सूतोवाच

    शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना अशा प्रकारच्या काही तरी हालचाली सुरू असल्याचे सांगितले. आपल्या पक्षाच्या खासदारांना आमिषे दाखवली जात असल्याची माहिती आपण पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तींच्या कानावर घातल्याचेही त्यांनी सांगितले. ‘‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची अलिकडेच बैठक घेत त्यांची गाऱ्हाणी ऐकली. मात्र आमच्या पक्षाकडून खासदारांची मने जाणून घेण्याबाबत फारसे काही झाल्याचे दिसून येत नाही’, असेही या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा