• Tue. Jun 16th, 2026

    Mumbai Local: रात्री परतीच्या प्रवासात मुंबईकरांची रखडपट्टी, CSMT-कुर्ला, ठाणे अनेक फेऱ्या रद्द; शेवटच्या लोकलमध्येही बदल

    Mumbai Local: रात्री परतीच्या प्रवासात मुंबईकरांची रखडपट्टी, CSMT-कुर्ला, ठाणे अनेक फेऱ्या रद्द; शेवटच्या लोकलमध्येही बदल

    Prabhadevi Bridge: वरळी-शिवडी कनेक्टरचा भाग म्हणून प्रभादेवी येथे डबल डेकर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वे मार्गावरील पुलाचं पाडकाम झालं. आता सोमवार ते शनिवार मध्य रेल्वेरवरील काम सुरू असेल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेवर रात्री परतीच्या प्रवासात नोकरदारांची रखडपट्टी होण्याचे संकेत आहेत. प्रभादेवी रेल्वे उड्डाणपुलाचा मध्य रेल्वे रुळांवरील भाग पाडण्यास रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून सुरुवात केली आहे. रोज एका मार्गिकेवर ब्लॉक घेऊन टप्प्याटप्प्याने पाडकाम सुरू राहणार आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतरच्या सहा तासांत काम पूर्ण करण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी-कुर्ला, ठाणे अशा लोकल फेऱ्या रद्द राहणार असून शेवटच्या लोकलमध्ये बदल होणार आहेत.

    प्रभादेवीमध्ये डबलडेकर पूल

    मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमधील वरळी-शिवडी कनेक्टरचा भाग असलेला ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल पाडून त्याजागी डबलडेकर पूल उभारण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील पुलाचा भाग नुकताच हटवण्यात आला आहे.Maharashtra TimesWorli-Sewri Elevated Road: मध्य-पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर डबल-डेकर पूल, वरळी-शिवडी उन्नत मार्गाला गती; सप्टेंबरची डेडलाइन

    मध्य रेल्वे रुळांवरील पुलाच्या भागाच्या पाडकामाला सोमवारपासून आरंभ झाला आहे. सोमवार ते शुक्रवार रोज मध्यरात्री चार तासांचा ब्लॉक घेऊन टप्प्याटप्प्याने पाडकाम सुरू राहणार आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर सहा तासांच्या ब्लॉकमध्ये संपूर्ण भाग हटवण्यात येईल. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या आणि काही मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    उन्हाचा ताप वाढता असताना मध्य रेल्वेवरील सामान्य आणि वातानुकूलित लोकल फेऱ्या सातत्याने विलंबाने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. अशातच आता कामावरून घरी जाण्याचा प्रवास आठवडाभर विलंबाने सुरू झाला आहे.

    Maharashtra TimesMumbai Local: सर्व लोकल 15 डब्यांच्या, ट्रेनला स्वयंचलित दरवाजे; स्थानकांच्या विकासासह अनेक कामं पूर्ण करण्याच्या सूचना

    परिणाम काय ?

    सोमवार ते शुक्रवारदरम्यान रोज रात्री ११.४० ते मध्यरात्रीनंतर ३.४० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. धीम्या / जलद अप आणि डाऊन मार्गावर स्वतंत्रपणे ब्लॉक असेल. या वेळेत संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या काही लोकल दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटीवरून कुर्ला आणि ठाणे स्थानकासाठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहणार आहेत. कल्याण, खोपोली, कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही लोकल कुर्ला, ठाणे, दादरपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे शेवटच्या लोकल वेळेतही बदल करण्यात येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा