Nashik Women Assault Case : विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात १८ मार्च २०२६ पासून नाशिक पोलिसांच्या कोठडीत असलेल्या संशयित अशोक खरात याची पोलिस कोठडी संपल्याने रविवारी त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात १८ मार्च २०२६ पासून नाशिक पोलिसांच्या कोठडीत असलेल्या संशयित खरात याची पोलिस कोठडी संपल्याने रविवारी (दि. २९) सकाळी पावणेबारा वाजता त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. संयुक्त दिवाणी न्यायाधीश आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. व्ही. भराडे यांच्या न्यायकक्षात युक्तिवाद झाला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेन्द्र बागडे, तर संशयिताकडून सचिन भाटे यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी पीडितेमार्फत एम. वाय. काळे यांनीही भूमिका मांडली. त्यावेळी सरकारी अभियोक्ता तथा सहाय्यक संचालक किरण बेंडभरदेखील उपस्थित होत्या.
Crime News : मिल्कशेक पिताच कॉन्स्टेबलचा मृत्यू, तीन वर्षांनी सिनेस्टाईल गुपित उलगडलं, लेकीचा Ex Boyfriend फुटला, महाराष्ट्र थक्क
ठराविक शब्द वापरुन नंबर सेव्ह
सुनावणीवेळी विशेष तपास पथकाचे (एसआयटी) पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी तपासातील मुद्दे स्पष्ट केले. खरातने काही मोबाइल क्रमांक संशयास्पदरित्या किंवा ठराविक शब्दांचा वापर करून नोंदवले आहेत. या डिजिटल विश्लेषणासाठी खरातची कोठडी अपेक्षित असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. त्यानुसार न्यायालयाने खरातच्या वाढीव पोलिस कोठडीचे आदेश दिले.दरम्यान, खरातविरुद्ध अत्याचाराचे आठ आणि खंडणी व फसवणुकीचे दोन असे एकूण दहा गुन्हे नोंद असल्याची माहिती ‘एसआयटी’ने दिली. न्यायालयात फक्त १७ मार्च रोजी सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यातील मुद्दे, पीडितेची फिर्याद यांवरून युक्तिवाद झाला. खरातच्या इतर कुकर्मांबाबत सबळ पुरावे प्राप्त होत असून, पुढील काही दिवस त्याचा मुक्काम पोलिस कोठडीतच राहण्याची चिन्हे आहेत.
Ashish Meshram : चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक
आतापर्यंत काय घडले?
दि. १७ : रात्री उशिरा खरातविरुद्ध पहिला गुन्हा
दि. १८ : पहाटे तीन वाजता गुंडाविरोधी पथकाकडून अटक
दि. १९ : विशेष तपास पथक दाखल
दि. २१ : खरातविरुद्ध अत्याचार व गर्भपात असे दोन स्वतंत्र गुन्हे
दि. २३ : खरातविरुद्ध अत्याचाराचे आणखी तीन गुन्हे
दि. २४ : अविवाहित युवतीच्या फिर्यादीवरून खरातविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा
दि. २५ : खरातविरुद्ध खंडणीचा गुन्हा
दि. २७ : अत्याचार व खंडणीचे दोन स्वतंत्र गुन्हे
दि. १८ ते २४ : पोलिस कोठडीचा पहिला टप्पा
दि. २५ ते २९ : कोठडीचा दुसरा टप्पा
चाकणकरांसह आमदार, मंत्री अडकू शकतात, खरात प्रकरणातील सर्वांवर कारवाई करा; भास्कर जाधवांची मागणी
चाकणकरांना नोटीस बजावल्याची चर्चा; ‘एसआयटी’चा दुजोरा नाही
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना नोटीस बजावल्याची चर्चा असून ‘एसआयटी’ने त्यास दुजोरा दिलेला नाही. संवेदनशील प्रकरण असल्याचे सांगत शहर पोलिसांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराचा सकाळी दहा वाजता ताबा घेतला. दंगल नियंत्रण पथक, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर साडेदहा वाजता गुन्हे शाखा युनिट एक आणि अमली पदार्थविरोधी पथकाला पाचारण करण्यात आले.
Crime News : इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली
एक पोलिस उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, तीनपेक्षा जास्त पोलिस निरीक्षकांसह किमान साठपेक्षा जास्त पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यातच खरात याला न्यायालयाच्या आवारातील मागील दरवाजातून विशेष सुरक्षेत आणले गेले. न्यायकक्षात पीडितेचे वकील जात असताना त्यांनाही पोलिसांनी रोखले. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. तर पोलिसांनी सुरक्षेचा पुन्हा अतिरेक केल्याची कुजबुज न्यायालयीन आवारात होती.
