• Sat. Jun 20th, 2026
    Sushma Andhare : ‘दीपक केसरकरांसोबत दिसणारा नामकर्ण आवारे ब्लॅक पैसे व्हाईट करतो’, सुषमा अंधारेंचा आरोपांचा बॉम्ब

    ‘दीपक केसरकर आणि ‘जगदंब’ पतसंस्थेचे नामकर्ण आवारे यांचे नेमके संबंध काय?’, सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणावरून केसरकरांवर नवे आरोप केले आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत एक मोठा आरोपही केला आहे.

    सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकरांवर केले नवे आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेत माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यांनी ‘जगदंब’ पतसंस्थेचे नामकर्ण आवारे आणि केसरकर यांच्यातील संशयास्पद संबंधांवर बोट ठेवलं आहे. अंधारे यांनी “केसरकरांच्या प्रत्येक फोटोत दिसणारा हा माणूस नेमकं काय करतो?” असा सवाल करत सरकारला कारवाई करण्याचं आव्हान केलं आहे. केसरकर यांनी आपल्याविरोधात कट रचला जात असल्याचे विधान केले होते, ज्याचा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला.

    केसरकरांचे विधान ‘बालिश आणि हास्यास्पद’

    सुषमा अंधारे म्हणाल्या की, “केसरकर म्हणतात माझ्याविरोधात कट केला जात आहे, हे मला बालिश आणि हास्यास्पद वाटते. केसरकर स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासार्ह व्यक्ती मानतात आणि म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, जर तुम्ही खरोखरच इतके विश्वासार्ह असता, तर आज तुम्ही मंत्रिमंडळात असता,” असा टोला त्यांनी लगावला.

    भांडाफोड’ करण्याचे अंधारेंचे आव्हान

    केसरकरांच्या चौकशीच्या विधानावर बोलताना अंधारे यांनी त्यांना थेट आव्हान दिले. “केसरकर म्हणतात की माझी चौकशी का करायची? नाहीतर मी सर्वांचा भांडाफोड करेन. मी त्यांना आवाहन करते की, त्यांनी एकदाचा तो भांडाफोड करावाच. जी काही ३९ नावे असतील ती समोर येऊ द्या. त्यात जे कोणी ८-९ मंत्री, पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांची नावे जाहीर करा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesNCP Merger : महाराष्ट्राच्या राजकाणात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याची चर्चा, नेमकं घडलं काय? वाचा A टू Z

    कोण आहे ‘पिवळ्या शर्ट’मधला व्यक्ती?

    अंधारे यांनी केसरकरांच्या फोटोंचा संदर्भ देत एका व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “मी परवा त्यांचा एक फोटो दाखवला होता, ज्यामध्ये एका पिवळा शर्ट घातलेल्या व्यक्तीला मी सर्कल केले आहे. हा माणूस केसरकरांसोबत नेमका काय करतोय, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. तो माणूस फक्त एका फोटोत नाही, तर अनेक महत्त्वाच्या बैठकांच्या फोटोंमध्येही दिसतो. रूपाली चाकणकर यांच्यासोबतच्या फोटोंमध्येही तो पाद्यपूजा करताना दिसतो, तर कधी खरातच्या बाजूला दिसतो. हा माणूस सर्वच ठिकाणी का दिसतो?”

    ‘ब्लॅक टू व्हाईट’चे आरोप

    या व्यक्तीची ओळख पटवून देताना अंधारे यांनी सांगितले की, “हा व्यक्ती नामकर्ण एकनाथ आवारे असून तो ‘जगदंब’ पतसंस्थेचा प्रमुख आहे. स्टाईस असोसिएशनशीही त्याचा संबंध आहे. मी जेवढी स्थानिकांकडून माहिती घेतली त्यानुसार हा व्यक्ती अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे ‘ब्लॅक मनी’ व्हाईट करण्याचे काम करतो. याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे.”

    Maharashtra TimesAshok Kharat Case : अशोक खरातचे 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती, एसआयटीचे तीन संस्थांना पत्र, भोंदू बाबाची संपूर्ण ‘कुंडली’ बाहेर येणार

    ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’

    पुढे, अंधारे म्हणाल्या की, “केसरकर, तुमचे काम शालेय शिक्षणमंत्री म्हणून आहे, मग हा पतसंस्थेचा माणूस तुमच्यासोबत वारंवार का दिसतो? तुमच्याकडे जर ४० लोकांची माहिती आहे आणि ती तुम्ही दडवून ठेवत असाल, तर तो गुन्हा आहे. या नामकर्ण आवारेशी तुमचे नेमके नाते काय? ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे आता जनतेसमोर आलेच पाहिजे.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा