राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांचं खंडन केलं होतं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती. तसेच त्यासाठी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या, असा दावा करण्यात आला होता. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. पण आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य कारण ठरलं आहे. हा नेमका विषय काय आहे ते सविस्तर समजून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर ती अभिमानाची बाब असेल, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजून वेळ निघून गेलेली नाही, असंही वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?
“दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी व्हायला पाहिजेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा होते. तोच मान सुनेत्रा वहिनींना मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती. त्यानंतर सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. राज्याच्या उपमुख्यमंत्रीदेखील झाल्या आहेत. सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनी यांचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण करुन एकत्रपणाने पुढे जात असेल तर आम्हालादेखील त्याचा अभिमान असेल”, असं मोठं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“आमदार सुनील आण्णा शेळके हे पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत. ते तरुण आमदार आहेत. अजित दादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी नेहमीच उत्तम पद्धतीने काम केलं आहे. ते मावळ मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी जी काही भावना व्यक्त केली ती व्यक्तीगत होती की त्यांच्याकडे यासंदर्भात काही माहिती होती त्याबाबत मला कल्पना नाही”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
“सुनील आण्णा यांनी जे मत व्यक्त केलं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. एक नक्की आहे की, अजित पवार यांच्या निधननंतर सुनेत्रा वहिणी यांच्या नेतृत्वात पक्षाचं काम पुढच्या कालावधीत सुरू राहावं. हा निर्णय त्यांच्या सर्वांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. वहिनी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारभार करत आहेत, अतिशय संयमाने, सोशिकतेने, मनावर प्रचंड मोठा आघात झालेला असताना ज्या पद्धतीने जबाबदारी सांभळत आहेत ही बाब आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
“सुनील शेळके यांनी विलीनीकरणाबाबत म्हटलं आहे, पण विलीनीकरणाबाबत तशी काही चर्चा आहे का? ते मला माहिती नाही. समजा, जर असेल तर त्या संदर्भातील अंतिम निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील”, असंही तटकरे म्हणाले.
दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणावर भाजपचा दबाव आहे का?
“भाजपकडून कधी दबाव राहिलेलाच नाही. कारण ज्यावेळी आम्ही अजित दादांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी आम्हाला त्या प्रक्रियेत मार्गदर्शन केलं. आमच्या एनडीएमध्ये सहभाग हा देशाचा आणि राज्याच्या प्रगतीमध्ये राहिला. त्यानंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्या सर्वांनी पाहिलेल्या आहेत. तो निर्णय अजित दादांनी घेत असताना त्यांच्या निर्णयासोबत आम्ही सर्व जण राहिलो”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
“त्यानंतरच्या कालावधीत भाजप पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीत केव्हाच हस्तक्षेप केला नाही. याउलट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाने आम्हाला नेहमीच एक मित्रपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली. त्यामुळे त्यांचा दबाव या विषयाबाबत कधी नव्हता. राहिला विषय पक्षांतर्गतचा, तर पक्षांतर्गत आमचं कुणाचं काही म्हणण्याचं कारणच नाही. त्यामुळे तसे असेल तर वहिनी या संदर्भातील निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील. या क्षणाला माझ्याकडे या संदर्भातली कुठलीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करु इच्छित नाही”, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.
“ज्येष्ठ आमदार सुनील तटकरे यांनी कोणत्या मुद्द्यावरुन वक्तव्य केलं आहे ते मला माहिती नाही. त्यांनी मुलाखतीत असताना त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना वक्तव्य केलं का, मला त्याबाबत माहिती नसल्याने मी त्या विषयावर अधिक भाष्य करु इच्छित नाही”, असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं.
“सुरुवातीच्या काळात आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला तो त्यांच्या सहमतीनेच घेतला की, त्या उपमुख्यमंत्री असतील आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी असेल. यानंतर विलीनीकरणाच्या विषयावर पडदाच पूर्णपणाने पडला असल्याने आमचा सुनेत्रा पवार यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही”, अशीदेखील प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा