शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर, रुपाली चाकणकर आणि अशोख खरात यांचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले होते. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? आणि तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या? असे प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केले होते. आता, पुन्हा पत्रकार परिषद घेत अंधारेंनी आणखी काही फोटो दाखवत दीपक केसरकर यांना सवाल केले आहेत. माझ्याविरोधात कट कारस्थान आहे असं म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना फोटो दाखवून अंधारेंनी सवाल केले. 39 लोक गेले, मग मला एकट्यालाच का टार्गेट करत आहेत? असा सवाल करणाऱ्या केसरकरांना आता अंधारेंनी शब्दात पकडलं आहे. अंधारे काय म्हणाल्या पाहा…