• Sun. Jun 7th, 2026
    Ambabai Mandir: करवीर निवासिनी अंबाबाई चरणी भाविकांच्या भक्तीची लाट; महिन्यात 1 कोटी 40 लाख 61 हजारांची देणगी

    Kolhapur News: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी अभिषेक मंडपात ही मोजदाद पूर्ण झाली.

    करवीर निवासिनी अंबाबाई चरणी भाविकांच्या भक्तीची लाट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी असतात. या भक्तांकडून देवीला भरभरून दान अर्पण केलं जात असतं. याचीच मोजदाद वेळोवेळी देवस्थान समितीकडून करण्यात येते. नुकतीच पुन्हा एकदा मंदिरातील दानपेटीमधील मोजदाद करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असल्याचे दानपेट्यांच्या मोजदादीतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. गेल्या एका महिनाभरात 12 दानपेट्यांमध्ये 1 कोटी 40 लाख 61 हजार 865 रुपयांचे दान जमा झाले आहे.

    कडक बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया
    मंदिरात विविध ठिकाणी ठेवलेल्या 12 दानपेट्या भाविकांच्या उदारतेने भरलेल्या होत्या. दर दोन-तीन महिन्यांनी होणाऱ्या या मोजदादीसाठी गेल्या चार दिवसांपासून 30 कर्मचारी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कार्यरत होते. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या देखरेखीखाली प्रत्येक नोटा, शिल्लक मोजणी करण्यात आली. मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे म्हणाले, “भाविकांची ही देणगी म्हणजे देवीवरील श्रद्धा आहे. पारदर्शकतेसाठी सर्व प्रक्रिया अधिकृत पद्धतीने सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन पार पडली आहे.”

    बारा दानपेटी मध्ये किती रक्कम?
    मोजदादीत पेटी क्रमांक 2 मधून सर्वाधिक 33 लाख 10 हजार 941 रुपये, तर पेटी 11 मधून 33 लाख 903 रुपये काढण्यात आले आहेत. पेटी 7 (28 लाख 60 हजार 425), पेटी 1 (27 लाख 14 हजार 256), पेटी 12 (7 लाख 15 हजार 914) यांसारख्या पेट्यांतही मोठ्या रकमा होत्या. उर्वरित पेटी 8 (2 लाख 23 हजार 905), पेटी 5 (2 लाख 17 हजार 757), पेटी 6 (2 लाख 8 हजार 782), पेटी 3 (1 लाख 62 हजार 767), पेटी 4 (1 लाख 12 हजार 717), पेटी 10 (1 लाख 24 हजार 354) आणि पेटी 9 (1 लाख 9 हजार 144) रुपये अशी देणगी मोजण्यात आली आहे.

    दरम्यान, दानपेट्यांमधील या देणगीमुळे देवीच्या खजिन्यात भर पडली असून, भाविकांची संख्याही वाढत आहे. तर ही देणगी कोल्हापूरच्या धार्मिक वैभवाची साक्ष आहे, असेही भाविक म्हणतात.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा