• Thu. Sep 10th, 2026
कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा मुख्यमंत्र्यांना फोन, फडणवीसांनी सगळं सांगितलं

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एकीकडे राज्यात अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचेही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील क्लार्कशी संबंधित लाच प्रकरणामुळे आधीच वादात सापडलेले अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित व्हायरल व्हिडिओ शासकीय निवासस्थानावरील असल्याने शासकीय निवासस्थानाचा चुकीचा वापर केला गेल्याचं सांगत विरोधकांकडून नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे झिरवाळांवर कारवाई करणार का, असा प्रश्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. तसंच अशोक खरात प्रकरणावरूनही भूमिका स्पष्ट केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed