Dombivli Teacher Molested : शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी जर आपल्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली : डोंबिवलीतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेला ट्रस्टीच्या मुलाने आक्षेपार्ह व्हिडीओ वारंवार पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत या शिक्षिकेने शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी शिक्षिकेलाच दोषी ठरवल्याने अखेर मनसेची मदत घेतली. यानंतर मानपाडा पोलिसांनी सरवन अय्यर याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
सागाव भागातील एका शाळेच्या शिक्षिकेला संगणक शिक्षक असलेल्या अय्यर याने शाळेच्या मोबाइल क्रमांकावरून मेसेज केले. शाळेतील लिपिक मेसेज करत असतील, असे समजून या शिक्षिकेने मेसेजला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सरवन याने आपल्या वैयक्तिक नंबरवरून या शिक्षिकेकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या. मात्र तिने त्याला नेहमी समजावत नकार दिला. त्यानंतर त्याने अश्लील व्हिडीओ पाठवले. हा त्रास सहन न झाल्याने या शिक्षिकेने मुख्याध्यापकाकडे तक्रार केली. त्यावेळी मुख्याध्यापकाने एआयच्या मदतीने व्हिडीओ तयार करत ट्रस्टीच्या मुलाला बदनाम करत असल्याचे सांगत फटकारले. Kolhapur News : खेळताना अचानक लागलेली उचकी ठरली काळ, कोल्हापूरच्या चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत
पोलिसांकडून आरोपीला अटक
दरम्यान सहावीच्या वर्गातील काही विद्यार्थिनींनी या अय्यर विरोधात तक्रार करताच घटनेचे गांभीर्य समजून घेत त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. याबाबत गुरूवारी मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक देत सरवनवर कारवाई करण्याची मागणी करत गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी सरवनला ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणी शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी जर आपल्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. Crime News : 28 वर्षीय बॉडीबिल्डरचा स्वतःवरच वार, जी झिरो फॅट बॉडी मिरवली, तीच ठरली जीवघेणी
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा