• Sun. Jun 14th, 2026
    Pune Land Scam: अपर तहसीलदारांना सक्तीची रजा; पुणे जिल्ह्यातील जमीन नोंदी फेरफार प्रकरणी आदेश

    Pune Land Scam: दोषी आढळलेल्या १५ जणांमध्ये १० तत्कालीन तहसीलदार, एक तत्कालीन मंडळ अधिकारी, तीन तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी व एक तत्कालीन लिपिक यांचा समावेश आहे.

    पुणे जमीन नोंदी फेरफार प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम १५५ चा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील जमिनींच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याप्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या १५ बड्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये खेड येथील तत्कालीन तहसीलदार व सध्याच्या मालेगाव येथील अपर तहसीलदार ज्योती देवरे यांचाही समावेश आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५५ नुसार, महसूल अधिकाऱ्यांना अभिलेखातील स्पेलिंग दुरुस्ती किंवा किरकोळ तांत्रिक चुका सुधारण्याचे अधिकार आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ, इंदापूर व शिरूर यांसारख्या तालुक्यांमध्ये या कलमाचा आधार घेत जमिनींचे मालकी हक्क बदलणे, क्षेत्रफळात फेरफार करणे आणि ‘भोगवटदार वर्ग-२’ ची जमीन बेकायदेशीरपणे ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतरित करण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले.

    Maharashtra TimesAshok Kharat Case: अशोक खरातची आर्थिक नाकाबंदी; झाडाझडतीनंतर ऑफिस सील, बँक खातीही केली सीझ
    याप्रकरणी तक्रारी झाल्याने शासनाने नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. समितीने २,३८३ प्रकरणांची तपासणी केली असता, त्यातील १३ प्रकरणे ‘अ’ वर्गवारीतील (अतिगंभीर) असल्याचे आढळले. या प्रकरणांमध्ये कायद्याचा जाणीवपूर्वक गैरवापर करून मालकी हक्कात बेकायदेशीर फेरबदल केल्याचे समितीने निष्कर्ष नोंदवले आहेत. तसेच संबंधितांना नोटिसा न बजावता परस्पर आदेश देण्यात आल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित झाली होती. त्यावर संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्यानुसार १५ जणांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    Maharashtra TimesAshok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नवी अपडेट; तब्बल २७६ व्हिडिओ पोलिसांच्या हाती, बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती
    पंधरा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश
    मालेगाव येथे अपर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती देवरे यांचाही त्यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथे तहसीलदार असताना त्यांनी अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे देवरे अडचणीत आल्या आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा