• Sun. Jun 14th, 2026
    Crime News : गाणगापूरला जाताना वाद, भररस्त्यात बायकोचा जीव घेतला; बारामतीकर तरुणाला अटक

    Baramati Kalburgi Crime News: गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना पतीने पत्नीला कारमधून ओढून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडले.

    कलबुर्गी कार हत्या व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यात पत्नीची अमानुष पद्धतीने हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून या घटनेनं संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. बारामती येथील अक्षय आणि शैला हे दाम्पत्य देवदर्शनासाठी गाणगापूरला गेले असताना हा भीषण प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यातील किरकोळ वादातून संतापलेल्या अक्षयने पत्नी शैलाला कारमधून ओढून बाहेर काढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

    महिलेचा जागीच मृत्यू

    अक्षयने धारदार शस्त्राने शैलाचागळा चिरला. तो इतक्यावरच न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून कार चालवत तिला चिरडलं, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली असून, ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला कर्नाटकात आणून हा कट रचल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत.Maharashtra TimesSindhudurg Crime News : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू, अज्ञातस्थळी पार्थिव आढळलं; डोक्यावर गोळी मारल्याचे निशाण

    नागरिकांची मध्यस्थी अन्…

    हा संतापजनक प्रकार पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार काही स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात देखील कैद केला आहे. नागरिक तिथे असेपर्यंत आरोपी मी काहीच करत नसल्याचं भासवत होता. मात्र, नागरिक बाजूला होताच त्याने क्रूरतेचा कळस गाठला.

    पत्नीला कारखाली चिरडलं

    मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्यापत्नीवर आरोपी पतीने थेट कार चढवली. अत्यंत अमानुषपणे कार खाली चिरडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन या २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानं पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    Maharashtra TimesAshok Kharat Case Update : शक्तिवर्धक औषधांमुळे बसलेला अर्धांगवायूचा झटका, खरातच्या HIV टेस्टचा निकालही समोर आला

    पुण्यात प्रेमविवाहाचा भयंकर शेवट

    पुण्यातल्या कात्रज भागात एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर जुळलेलं प्रेम, त्यातून झालेला विवाह, पण त्यानंतर सुरू झालेला छळ अखेर एका २० वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. पत्नी आणि तिच्या माहेरच्यांच्या कथित त्रासाला कंटाळून तरुणाने उंदीर मारायचं औषध पिऊन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद साद (साद) आसीफ सय्यद असं मृत तरुणाचं नाव आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा