Ram Navami 2026: मिरवणुकीच्या मार्गानुसार वाहतूक नियंत्रणात सतत बदल होत राहणार असल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाजीराव रस्ता आणि लष्कर परिसरात मिरवणुका निघणार असल्याने विश्रामबाग आणि लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद किंवा वळवली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना निर्बंध लागू राहतील. विश्रामबाग विभागात पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने टिळक रस्त्याने वळवून पुढे अलका टॉकीज चौक आणि खंडुजी बाबा चौक मार्गे सोडण्यात येणार आहेत. लष्कर भागात वाय जंक्शनहून एमजी रोडकडे येणारी वाहतूक थांबविण्यात येणार आहे. मिरवणूक पुढे सरकत राहिल्यानुसार १५ ऑगस्ट चौक, महमंद रफी चौक आणि कोहिनूर हॉटेल परिसरात टप्प्याटप्प्याने वाहतूक वळवली जाणार आहे.
Pune News : पुण्यात तरुणाने तरुणीला प्रेमाच्या नावाने फसवलं; प्रेम, लग्नाचं आमिष अन् नोकरी लागताच पलटला
काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून ती ईस्ट स्ट्रीट, भोपळे चौक, कुरेशी मशीद आणि सेंटर स्ट्रीट मार्गे सोडण्यात येणार आहे.
Pune Crime: लग्नाचं आमिष आणि फोटो व्हायरलची धमकी; चंदननगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधमांना बेड्या
पोलिसांचे तोंडावर बोट
टिळक स्मारक ते पेरूगेटमार्गे नारायण पेठेकडे जाणारा रस्ता रामनवमीच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. बुधवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा रस्ता सुरुवातीलाच अडविण्यात आला होता, मात्र याबाबत संबंधित यंत्रणांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या प्रकाराबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ठोस स्पष्टीकरण देण्याचे टाळले. स्थानिक पोलिसांकडे विचारणा केली असता, ‘कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे; मात्र वाहतूक बंद करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांकडे आहे,’ असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रस्ता बंद करण्यात आला असताना जबाबदारी नेमकी कोणाची, यावरच प्रशासनातील संभ्रम उघड झाला. विशेष म्हणजे, हा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सायंकाळी उशिरा विश्रामबाग पोलिसांनी आयोजकांना वाहतुकीसाठी जागा देण्याची सूचना केली.
