• Sun. Jun 14th, 2026
    भटक्या कुत्र्याची झडप, वंशिकाताई धीराने लढली, स्वतः जखमी झाली, पण चिमुकल्या भावावर ओरखडाही नाही, अंबरनाथमधील घटना

    Ambernath Girl Saves brother from Dog Attack : अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील वांद्रापाडा येथे राहणारी वंशिका नांगर ही विद्यार्थिनी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या सहा वर्षांच्या भावासोबत घरी जात असताना अचानक एका भटक्या श्वानाने तिच्या भावावर हल्ला केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : सकाळी दहाची वेळ, ११ वर्षांची विद्यार्थिनी सहा वर्षांच्या आपल्या भावासोबत शाळेतून घरी परतत होती. तेवढ्यात एका भटक्या श्वानाने सहा वर्षीय चिमुरड्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने अजिबात न घाबरता विद्यार्थिनीने हल्लेखोर श्वानाशी झुंज देत भावाचे रक्षण केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. अंबरनाथमधील या घटनेने भटक्या श्वानांच्या उपद्रवाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील वांद्रापाडा येथे राहणारी वंशिका नांगर ही विद्यार्थिनी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या सहा वर्षांच्या भावासोबत घरी जात होती. अचानक एका भटक्या श्वानाने तिच्या भावावर हल्ला केला. आपल्या भावाला कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी वंशिकाने त्या भटक्या श्वानाशी धीरोदात्तपणे झुंज दिली. वंशिकाच्या आक्रमक पवित्र्याने गांगरलेल्या श्वानाने तिच्यावर जोरदार हल्ला केला. वंशिका यात जबर जखमी झाली.
    Maharashtra TimesPune Accident : रात्रीच्या अंधारात काळाचा घाला, चिंचवडच्या कुटुंबाची कार बसखाली घुसली, आई-वडील-आजीचा मृत्यू, दोन लेकरं पोरकी
    वंशिका आणि तिच्या भावाच्या आरडाओरड्याने सतर्क झालेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत वंशिकाची सुटका केली. जखमी वंशिकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वानाशी लढताना वंशिकाने भावाला कोणतीही इजा होऊ दिली नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

    खरात प्रकरण बड्या नेत्यांना अडकवणार? फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

    प्रशासनावर तीव्र नाराजी

    या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेची दखल घेत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कार्यवाही करत परिसरातील १८ श्वानांना ताब्यात घेऊन त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली. शहरातील भटक्या श्वानाना पकडताना अनेकदा श्वान प्रेमींकडून अडथळे येत असल्याची तक्रार आरोग्य विभागाचे अधिकारी करत आहेत.
    Maharashtra Timesकार दुभाजकावर आदळून उलटली, प्रसिद्ध अभिनेत्री Harshil Kalia हिचा मृत्यू, ऐन तिशीत जगाचा निरोप
    या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी प्रशासनाच्या निष्काळजीविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. श्वान पकडणारे जाळे घेऊन नगर परिषदेत प्रवेश करत आरोग्य विभागाच्या अधिकऱ्यांना जाळ्यात पकडून श्वानांच्या केंद्रात सोडण्याची गरज असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा