• Sat. Jun 13th, 2026
    Ashok Kharat : ‘डोळ्यांना भुरळ’ आणि थेट लाखोंचा सौदा; शिर्डी विमानतळाजवळ अशोक खरातचा 64 लाखांचा जमीन व्यवहार उघड

    भोंदूबाबा अशोक खरात याचा शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात तब्बल ५ एकर जमिनीचा ६४ लाखांचा व्यवहार उघड. भक्तांना फसवून जमवलेली ही अफाट ‘माया’ पाहून सर्वसामान्य थक्क झाले असून पोलीस या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करत आहेत.

    भोंदू बाबा अशोक खरात जमीन व्यवहार शिर्डी काकडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, शिर्डी: भोंदूगिरीच्या जाळ्यात अनेकांना ओढणाऱ्या अशोक खरात याच्या अजब ‘मोहमाये’चा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीतील दोन प्लॉटची चर्चा ताजी असतानाच, आता कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तब्बल पाच एकर जमिनीचा व्यवहार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, खरातला केवळ दोन वर्षांपूर्वी विमानतळाकडे जाताना हा प्लॉट डोळ्यांना ‘भूल’ पडली आणि थेट खरेदीची प्रक्रियाच सुरू केली, अशी माहिती आता समोर येत आहे.

    शिर्डी विमानतळापासून जवळच असलेल्या काकडी शिवारात ही पाच एकर जमीन आहे. दोन वर्षांपूर्वी अशोक खरात या परिसरातून जात असताना त्याला ही मोकळी जमीन दिसली आणि त्याने ती खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. या जमिनीचे मालक विजय कोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने ही जागा ‘पसंतीस’ उतरल्याचे सांगत व्यवहाराला सुरुवात केली होती. विमानतळाच्या अगदी जवळ असलेली ही मोकळी जमीन भविष्यातील मोठ्या आर्थिक लाभाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.

    साठेखत करत भरले इतके लाखांचे मुद्रांक शुल्क

    मिळालेल्या माहितीनुसार, साधारण वर्षभरापूर्वी या पाच एकर जमिनीचा व्यवहार ६४ लाख ४० हजार रुपयांना निश्चित झाला असून त्याचे ‘साठेखत’ करण्यात आले आहे. ही जमीन अकृषिक (NA) झाल्यानंतर ती रीतसर अशोक खरातच्या नावावर केली जाणार होती. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी खरातने ३ लाख ८६ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क देखील बाजारभावाप्रमाणे आणि ३० हजारांचे नोंदणी शुल्क भरल्याचे उघड झाले आहे.

    Maharashtra TimesPune Crime : ‘माझ्या बहिणीला का छेडतो?’, आईसोबत जाताना तरुणाला घेरलं, माऊलीसमोर पुण्यात लेकाला बेदम मारहाण

    काकडी परिसरात मोठी चर्चा

    एकीकडे भोंदू बाबाच्या ‘काळ्या कारनाम्यांचा’ तपास पोलीस करत असताना, दुसरीकडे त्याने जमवलेली ही अफाट ‘माया’ पाहून सर्वसामान्य थक्क झाले आहेत. शिर्डी विमानतळाच्या सान्निध्यात असलेल्या या मोकळ्या जमिनीवर खरातचा आधीपासूनच डोळा होता, अशी चर्चा आता काकडी परिसरात रंगली आहे. या व्यवहारासाठी इतकी मोठी रक्कम नेमकी कुठून आली? हा पैसा भक्तांना फसवून मिळवलेला आहे का? या दिशेने आता चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान भोंदू बाबाच्या प्रकरणात पुढे काय काय घडतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा