Shivajinagar-Swargate Metro: मुंबई मेट्रो 3च्या सीएसएमटी स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वीच परवानगीविना बोअरवेलचं काम हाती घेतल्याने बोगद्याला छिद्र पडली होती. यासाठी एका खासगी कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली असून आता पुण्यातही असाच एक प्रकार घडला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा प्रतिनिधी, पुणे: मेट्रोची परवानगी न घेताच मंडई स्थानकाजवळ सुरू असलेल्या बोअरवेलच्या कामामुळे थेट मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र पडल्याने पाणीगळती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगद्याला सहा इंचाचा खड्डा पडल्याने त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळण्यात तूर्तास यश मिळाले आहे.
खड्ड्यामुळे पाणीगळती
या प्रकरणी ‘महामेट्रो’चे संयुक्त महाव्यवस्थापक (सिव्हिल) शंतनु गोरात्रा यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार खडक पोलिसांनी घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘घरमालक मोटे यांना घराच्या जागेच्या खालून मेट्रोच्या भुयारी मार्गाचे बांधकाम झाल्याची माहिती होती. तरीही, त्यांनी निष्काळजीने बोअरवेलचे काम केले. त्यामुळे मेट्रोच्या बोगद्याला सहा इंचाचा खड्डा पडला. खड्ड्यामुळे मेट्रो मार्गिकेवर पाणीगळती झाली.LPG Shortage: गॅस बुकिंगसाठी 30 दिवसांची प्रतीक्षा, तरी बुकिंगच्या 10 दिवसांनंतरही सिलिंडर मिळेना; एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा
मोटे यांनी लोकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होणारे कृत्य केले; तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त निधी प्रकल्पातून ‘महामेट्रो’च्या मालमत्तेचे मूल्य किंवा उपयुक्तता नष्ट होईल किंवा कमी होईल असे कृत्य केले’, असे या तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी यांनी दिली. मेट्रोच्या मालमत्तचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Pune Metro: पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार; स्वारगेट-कात्रज मेट्रोचा विस्तार, थेट खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत वाढवण्यास मंजुरी
पाणीगळतीनंतर धावाधाव
मेट्रो संचलनादरम्यान मेट्रो चालकास बोगद्यात पाणीगळती झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने ही माहिती नियंत्रण कक्षाला कळविली. मेट्रो संचलनासाठी बोगद्यामध्ये विद्युत प्रवाहाच्या तारा जोडलेल्या असतात. बोअरवेल घेताना या विद्युत तारांना चुकूनही धक्का लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. बोअरवेल घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकदम हवेचा दाब आल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातडीने काम थांबवले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी ही घटना घडली. यानंतर रात्रीच्या वेळी मेट्रो सेवा बंद झाल्यानंतर दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. तपसाणी करून पुन्हा कोणताही धोका होणार नाही, याची खबरदारी घेतल्याचे मेट्रोतर्फे सांगण्यात आले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा