• Sat. Jun 6th, 2026

    Ajit Pawar: अजित पवारांच्या प्रकरणात महाराष्ट्रात FIR घेईनात, रोहित पवारांनी शक्कल लढवली; थेट कर्नाटकात तक्रार दाखल, तपास होणार

    Ajit Pawar: अजित पवारांच्या प्रकरणात महाराष्ट्रात FIR घेईनात, रोहित पवारांनी शक्कल लढवली; थेट कर्नाटकात तक्रार दाखल, तपास होणार

    Rohit Pawar: अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी दाखल झालेल्या या ‘झीरो एफआयआर’मुळे प्रकरणाचा तपास गुन्हेगारी दृष्टिकोनातून होण्याची शक्यता आहे.

    अजित पवारांच्या प्रकरणात महाराष्ट्रात FIR घेईनात, रोहित पवारांनी शक्कल लढवली; थेट कर्नाटकात तक्रार दाखल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याकडून बेंगळुरू येथे ‘झीरो एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. हा अपघात नसून, घातपात होता, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा आता बारामती पोलिसांकडे वर्ग होईल.

    मुंबईहून २८ जानेवारीला बारामतीकडे जाणारे खासगी ‘लिअरजेट ४५’ विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पायलट, सहपायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

    रोहित पवार यांनी यापूर्वी मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिस ठाणे आणि बारामती पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एफआयआर नोंदवली गेली नाही. पुणे सीआयडीकडून केवळ ‘ ॲक्सिडेंटल डेथ’च्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर अखेर कर्नाटकातील बेंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलिस ठाण्यात ‘झीरो एफआयआर’ दाखल करण्यात आली असून, पुढील तपासासाठी ती महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

    विमान उतरण्यासाठी पाच किलोमीटरची दृश्यमानता आवश्यक असते. मात्र, दोन-तीन किलोमीटर दृश्यमानतेवर परवानगी दिली गेली. उड्डाणास विलंब, धावपट्टी बदलण्याचा निर्णय, आणि ऐन वेळच्या घडामोडी यामुळे हा अपघात केवळ दुर्घटना नसून, कटकारस्थानाचा भाग असू शकतो, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

    ‘मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करून घ्यावा’

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ‘या अपघातप्रकरणी मी मरिन लाइन्स पोलिस ठाण्यामध्ये गेलो, मात्र तेथे तक्रार नोंदवून घेतली नाही. तुम्हाला सत्तेत बसविणाऱ्या अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अद्याप एफआयआर दाखल करण्यात आला नाही’, असे ते अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान म्हणाले. ‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन एफआयआर दाखल करून तपासाबाबत न्याय द्यावा’, अशी मागणी पवार यांनी केली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा